रक्ताच्या तुटवड्यावर घेतला रक्तदान शिबिराचा उपक्रम
मुंबई : मुंबईतील रुग्णालयांमध्ये आजघडीला मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते आहे. हीच गरज लक्षात घेऊन अभाविप मुंबई महानगराच्यावतीने मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आत्ता पर्यंत चेंबूर, दहिसर व दादर येथे पार पडलेल्या शिबिरांमध्ये एकूण ११४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
२२ एप्रिल रोजी विलेपार्ले आणि २४ एप्रिल रोजी तारखेस चुना भट्टी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन अभाविप व स्व. अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती तर्फे केले जात आहे. मुंबईला या रक्ताच्या तुठवड्यातून मुक्त करण्याकरिता अभाविप सदैव कटिबद्ध आहे तसेच या अभियानामध्ये अधिकाधिक युवकांनी सहभागी होत रक्तदान आणि प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन मुंबई महानगर मंत्री गौतमी अहिरराव यांनी केले आहे.