महाराष्ट्रात केंद्राने आणीबाणी लावावी ; काँग्रेस नेत्याची मागणी

    21-Apr-2021
Total Views |

uddhav thackeray_1 &



मुंबई :
कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशी मागणी विदर्भातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. काँग्रेस नेते आशिष देशमुखांच्या या पत्रामुळे विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनामुळे ६० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संविधानाच्या कलम ३६० अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांची आणीबाणी लावण्यात लागू करावी. अशीच परिस्थिती राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, अशी भीतीही आशिष देशमुख यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
 
 

आशिष देशमुखांच्या या पत्रावरून भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ट्विट करत ते म्हणतात," राज्यात आरोग्य व आर्थिक आणिबाणी लागू करा, काँग्रेस आमदाराचे पंतप्रधान मोदीना पत्र. राज्यातल ठाकरे सरकार पूर्ण अपयशी असल्याच आता काँग्रेसही बोलू लागली आहे. राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था आता सत्ताधारी कबूल करू लागले आहेत," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.