
नाशिक : एकीकडे राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. मात्र नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २४ रुग्ण दगावल्याची माहिती नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.घटनास्थळी भेट दिली.
यानंतर माहिती देताना आयुक्त बोलले,"याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. घटनेला कारणीभूत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह दाखल केला जाईल. आता परिस्थिती नियंत्रणात असून आत्ता उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना कुठेही हलवण्याची गरज नाही." अशी माहितीही त्यांनी दिली आहे. यावेळी १५० रुग्ण ऑक्सिजनवर होते त्यापैकी २४ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. यातीलच ११ ते १२ जण दगावले असल्याची माहितीही कैलास जाधव यांनी दिली. तसेच ही तांत्रिक बाब असून आत्ता याबाबत मी कोणतीही माहिती देत नाही. मात्र तातडीने उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत एकूण मृतांची संख्या २४ इतकी झाली होती.
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन टाकीत गळती झाल्याची झाली. हॉस्पिटलच्या ठिकाणी असलेल्या टाकीत ऑक्सिजन टँकरमधील ऑक्सिजन भरण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी ऑक्सिजनची गळती सुरू झाली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनवर असलेल्या १३१ रुग्णांचा जीव धोक्यात आला. या रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मनपाच्या अनेक अॅम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत.
तसेच, महापालिकेची रेस्क्यू टीम येथे तातडीने घटनास्थळी दाखल झाली. गेल्या अर्ध्या तापासून या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. एकीकडे ऑक्सिजन मिळत नसताना थेट ऑक्सिजनची गळती झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, गळतीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून तांब्याचा पाईप गळतीच्या ठिकाणी जोडण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये त्वरित ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.