ठाकरे सरकारचे सर्व घोटाळे उघड करणार : सोमय्या

    02-Apr-2021
Total Views |


somyya_1  H x W


धमक्यांना मी घाबरत नाही सोमय्या यांचा वायकराना प्रत्युत्तर

मुंबई : स्वत:च्या फायद्यासाठी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करुन जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास दिल्या प्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अबु्नुकसानीचा दावा दाखल केला. यावर भाजप नेते किरीट सोमैय्या यानी तुम्ही कितीही धमक्या दया ,तुमचे सगले घोटाले बाहेर काढल्याशिवाय सवस्थ बसणार नाही असा इशारा वायकर व ठाकरे सरकारला दिला आहे.
 
 
 
उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराचा कोर्लई जमीन घोटाल्या संबंधात, माझा विरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला. त्यांचा अशा धमक्यांना आम्ही भिक घालत नाही.ठाकरे सरकारचे, सचिन वाझे सह, सगळे घोटाळे.बाहेर काढल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे आज वायकर यानी सोमयया यांचा विरोधात कोर्टात केलेल्या दाव्यावर बोलताना म्हणाले.
 
 
 
अलिबाग कोर्लई येथील संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समाजमाध्यमांद्वारे केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. परंतु त्यांचे या सर्व निराधार आरोपात काहीच तथ्य नसल्याचे विविध प्रसामाध्यमांनीच पुढे उघडकीस आणल्याने सोमय्या या प्रकरणी तोंडघशी पडले असे वायकर यानी म्हटले.तसेच वायकर यांनी सोमय्या यांना या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास सिव्हील व क्रिमिनल कायदेशी कारवाई करण्याचा इशारा सोमय्या यांना नोटीसीद्वारे दिला होता.
 
 
 
 
त्यानुसार वायकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त तसेच एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यास पत्र देऊन बेताल व बिनबुडाचे वक्तव्य करुन जनमानसातिल लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करणार्‍या किरीट सोमय्या यांना लगाम घालण्याची उचित ती कारवाई करण्याची विनंतीही या अगोदर केली आहे.त्यानंतर आता सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रुपये १०० कोटींचा अबुनुकसानीचा दावा वायकर यानी दाखल केला. एवढेच नव्हे तर लवकरच याप्रश्‍नी ते क्रिमीनल दावाही दाखल करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले. त्यावर आम्ही भीत नाही जे करायच ते करा अस सोमय्या यानी म्हटले.