विक्रांत पाटलांनी घेतली युवराजांची फिरकी! : Video

    18-Apr-2021
Total Views |
rajesh tope _1  



मुंबई : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडता येणार आहे. अशातच राज्य सरकारचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनजागृती अभियान सुरू केले आहे. ज्यात ब्रेक द चेन का महत्वाची याबद्दलची माहिती देणारी एक चित्रफीत ट्विट केली आहे. यावरून  भाजप प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी यांनी खोचक टोला लगावला आहे. तुम्ही पेंग्विनची चित्रफित दाखवून युवराजांची टींगल तर करत नाहीत ना, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 
 
"राजेश टोपे साहेब तुम्ही पण आता युवराजांची मजा घ्यायला लागले की काय... हा व्हीडिओ टाकल्यामुळे समीर ठक्कर सारखे तुम्हाला पण खोट्या आरोपाखाली आत टाकतील.", असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विट केल्याबद्दल समीर ठक्कर यांच्यावर खटला दाखल करण्यात आल्याचा संदर्भ त्यांनी लावला आहे. माझ्या प्रमाणेच टोपे साहेबांवरही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे केस दाखल करणार का, असा उपरोधिक सवाल समीर ठक्कर यांनीही ट्विट करत विचारला आहे.