साहेबांचे ‘ब्रेक द चेन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2021   
Total Views |

uddhav _1  H x






“कोरोनाची तिसरी लाट आली, तरी आम्ही सज्ज आहोत,” असे आमचे साहेब म्हणालेत. पण खरं सांगू का! आली तर आली. कुणाला फरक पडतो. उलट आमच्यासाठी आरामच. ‘चाहे आग लगे बस्ती में, साहेब रहे मस्ती में.’ मस्ती म्हणजे आनंदात, उत्साहात. येऊ दे ती कोरोनाची लाट किंबहुना आलीच पाहिजे. नाही तर आमच्या साहेबांच्या ‘डब्ल्यूएचओ’पेक्षाही जास्त ज्ञानाचा काय फायदा? काय म्हणता घरात का नाही त्यांनी सल्ला दिला? हे बघा, ते लोकनेते आहेत. त्यामुळे त्यांनी ‘डब्ल्यूएचओ’पेक्षाही जास्त ज्ञानाचा वापर घरात केला नाही, तर ‘फेसबुक लाईव्ह’ करून जनतेला ज्ञान दिले. काय म्हणता, मी ‘मस्का पॉलिश’ करतो? असे म्हणून तुम्ही महाराष्ट्राचा अपमान केला. मराठी अस्मितेचा अपमान केला. जाऊ दे, मी या आघाडीचा शिल्पकार आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे ऐकणे हे माझ्या ‘पोझिशन’मध्ये बसत नाही. मी थेट मोदी किंवा जरा कमी अडचणीचे असले तर फडणवीसांबद्दल बोलतो. माझ्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले, मोठ्या साहेबांच्या सेनेला पार बदलून टाकले म्हणून लोक माझ्यावर रागावलेत, संतापलेत, पण मी मनावर घेत नाही. मन असतं, तर साहेबांचे खाऊन काकांच्या मनासारखं केले असते का? आता तिसरी कोरोनाची लाट येणार. आम्ही घरात ‘लॉकडाऊन’ ‘एन्जॉय’ करू, कोमट पाणी पिऊ. कुणी कुणाला भेटणार नाही. लोकांची कामाअभावी उपासमार होते? लहान कामगार भुकेने व्याकुळ, लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड नाही, औषधं मिळत नाही, कितीतरी लोक दररोज कोरोनाने मरत आहेत. या लोकांचे आम्हाला काही देणेघेणे नाही. मी ‘कोविड’ लस घेतली. राज्य आमचेच आहे. बेड किंवा औषधांशिवाय आम्ही मरणार नाही. काय म्हणता जनेतेचे काय? जनतेचे मला काय माहिती? आम्ही जनतेला मदत करणार नाही. कारण, त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. आम्हाला ‘चेक द ब्रेन’ नाही... नाही... ‘बे्रक द चेन’ करायचे आहे ना? काय म्हणता, गेल्या ‘लॉकडाऊन’मध्येच उपासमार होऊ नये म्हणून गळ्यातली सोन्याची चेन विकली. तुम्ही वेडे आहात. अन्नासाठी चेन विकली. साहेबांनी कितीदा सांगितले, कोमट पाणी प्या. पण नाही तुम्ही कोमट पाणी न पिता जेवता? झाले ना ‘ब्रेक द चेन’!
 
 

त्यांची पापं आणि कोरोना

 
कोरोनामुळे सगळीकडे हाहाकार पसरला, असे दृश्य आहे असे चित्र प्रसारमाध्यमं आणि आपले राज्य सरकार उभे करत आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, “कोरोना महाभयंकर आहे. ज्याला झाला त्याचा वाली देवच.” आता तर हवेतूनही कोरोना होऊ शकतो, तर आरोग्य क्षेत्रातील विशेषज्ज्ञांचे म्हणणे आहे की, १०० पैकी ९८ टक्के लोक योग्य उपचार आणि काळजी घेऊन बरे होत आहेत. तसे आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर हे सत्यच वाटते. कितीतरी लोक दवाखान्यातून घरी आले किंवा घरच्या घरी बरे झाले. माझ्या पाहण्यात तर वृद्ध व्यक्ती, दम्याने जीव नकोसा झालेल्या व्यक्ती इतकेच काय, दारू पिऊन शरीराचा खुळखुळा झालेले लोकही कोरोनाच्या आजारातून सहीसलामत बाहेर पडले. विविध सेवावस्त्यांवर गेलात तर दिसते की, इथे तर कुणालाच कोरोनाची भीती नाही आणि क्वचित कुणाला कोरोना झाला, पण लगेच आठ दिवसांत बरा झाला. या वस्त्यांवर कोरोनाची भीती नाही, तर ‘लॉकडाऊन’ आणि भुकेची भीती आहे. बाहेर जाण्यास बंदी, कामधंदेही बंद, छोटी-छोटीे टपरीवजा दुकानं तर केव्हाच बंद. रोजंदारीवर जाणारे मजूर, त्यांची कामं बंद. यांची नोंदणी कुठेही नाही. यांनी ‘शिवभोजन थाळी’ कधीही पाहिलेली नाही. या लोकांचे अपरिमित नुकसान. यांना पाहून प्रश्न पडतो की, यांना कोरोनाची भीती का नाही? बरं यांना कोरोनाही सहसा होत नाही. ‘हायजिन’ पाळणे, मास्क वापरणे आणि ‘सॅनिटायझर’ने सारखे सारखे हात धुणे या गोष्टी या बांधवांपासून कोसो दूर आहेत. एक मात्र आहे, कष्टाची कामं करून आणि कधी कधी रात्री जेवण नाही म्हणून पाणी पिऊन झोपणार्‍या या लोकांची प्रतिकारशक्ती चिवट आणि अत्यंत सक्षम आहे. याबद्दल बोलताना काही सेवावस्तीतले लोक म्हणतात, “इथं पोटाला अन्न मिळेना तिथे तुमच्या कोरोनाची उदबत्ती कुठं जाळीत्या.” त्यांचं म्हणणं आहे, मोठ्या लोकांची पापं दडवायला कोरोनाचे भूत उभे केले आहे. त्यांचंही म्हणणं खरं आहे. चांगली आरोग्य व्यवस्था आणि इतर सुविधा दिल्या, तर लोक कोरोनानेही मरणार नाहीत. बघा ना, कोरोनाच्या हाहाकारात आणि ‘रेमडेसिवीर’च्या टंचाईत महाराष्ट्र १०० कोटी घोटाळा, मनसुख हिरन, पूजा चव्हाण, दिशा सलियन, सुशांत सिंह आणि पालघर साधू हत्याकांड विसरलाच. नव्हे नव्हे, जनतेला विसरायला लावले!
@@AUTHORINFO_V1@@