असल परिवर्तन की खेलो होबे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2021   
Total Views |

Bengal_1  H x W
 
 
 
प. बंगालमध्ये २९४ विधानसभांसाठी अटीतटीची स्पर्धा सुरू आहे. भाजप बाजी मारणार आणि तृणमूलचा ‘खेला होबे’ होणार असे दिसते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीदरम्यान प. बंगालमध्ये काय काय घडामोडी घडत आहेत, हे पाहणे रोचक आहे. त्याचा घेतलेला हा आढावा.
 
“मी, ‘रॉयल बंगाल टायगर’ आहे. एक पाय ठेवून पश्चिम बंगाल जिंकेन आणि दुसरा पाय ठेवून दिल्ली जिंकेन. आमच्या पश्चिम बंगालमध्ये गुजरातींचे शासन चालणार नाही. पश्चिम बंगालमध्ये बाहेरच्या लोकांनी येऊ नये,” असे जाहीरपणे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. असे एकदाच नव्हे, तर प्रत्येक प्रचारसभेत, रॅलीत त्यांनी हेच पालुपद सुरू ठेवले. ज्याप्रमाणे मुंबईत आपले ‘बेस्ट सीएम’ आणि त्यांचे दूरदृष्टी संजय सातत्याने ‘मराठी अस्मिता, मराठी अस्मिता’ म्हणून आपले वैयक्तिक कौटुंबिक मनसुबे पार पाडतात. त्याप्रमाणेच सध्या ममतासुद्धा ‘बंगाली अस्मिता, बंगाली अस्मिता’ म्हणत, बंगाली जनतेकडे अस्मितेची अक्षरशः भीकच मागत आहेत. भीक यासाठी की, बंगालमध्ये १९५१ साली ७४ टक्के असलेले हिंदू आता २०११च्या जनगणेत ७० टक्के आहेत. याचाच अर्थ आजही प. बंगालमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत. पण, कम्युनिस्टांची डावी, क्रूर अशी तीन दशकांची राजवट आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांची एक दशकाची राजवट यामध्ये हा बहुसंख्य हिंदू अक्षरशः दबलाच गेलेला आहे. या दबलेल्या हिंदूंनाही अस्मिता असू शकते, याचा जणू बंगाली सत्ताधार्‍यांना विसरच पडला होता. मात्र, आता देशात सध्या हिंदुत्वाची लाट नव्हे, त्सुनामी आहे. या लाटेमध्ये टिकायचे तर प्रांतिक अस्मितेबद्दल बडबडल्याशिवाय पर्याय नाही, हे चाणाक्ष ममता बॅनर्जींना माहिती आहे. त्यामुळे तर त्या आता ‘बंगाली अस्मिता’ म्हणून प. बंगालच्या लोकांना एक होऊन तृणमूलला मत देण्याचे आवाहन करत आहेत.
 
 
 
मात्र, आधीच सांगितल्याप्रमाणे हे भीक मागणेच आहे. अत्याचारी राजवट क्रूरपणे राबवून, त्याच हिंदू बहुसंख्याकांना प्रांतिक अस्मितेचा मुलामा द्यायचा ममता प्रयत्न करत आहेत. पण, प. बंगालची जनता याला आता भीकही घालणार नाही. कारण प. बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बंगाली शिवाय कुणी येऊ नये, असे ममता म्हणतात. पण, त्याच वेळी ममतांनी सोनिया गांधी, शरद पवार, एमके स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, जगनमोहन रेड्डी, फारुख अब्दुल्ला, महबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांना स्वत:ला आणि तृणमूल पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मदत करण्याची याचना केली. आता हे सर्व जण काही प. बंगालचे स्थानिक किंवा बंगाली भाषक नाहीत. मग बंगाली अस्मितेचा गजर करताना ममता यांनी या प. बंगालच्या लोकांना आमंत्रण दिलेच ना? असे लोकांना वाटते.
 
 
असो. आपण ममता बॅनर्जी म्हणतो. पण, पश्चिम बंगालमध्ये भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दीदी’ वगैरे म्हणून संबोधित असले, तरी बहुसंख्य लोक पूर्वी आपापसात आणि आता खुलेआम ‘ममता बानो’ म्हणून ममता बॅनर्जी यांना संबोधित आहेत. लोक असे म्हणतात, कारण प. बंगालमध्ये ममता यांनी केलेले मुस्लीमधर्मीयांचे लांगुलचालन. मग मुस्लिमांसाठी दुर्गामातेचा विसर्जन सोहळा तिथीशिवाय दूर ढकलण्याचा असू दे की, दुर्गामातेचे पूजन चाललेल्या घाटावर लाऊड स्पीकरवरील दुर्गास्तवन बंद करून, ‘अल्ला ओ अकबर’चे गोडवे गाणारी गाणी लावली गेली. त्यावर ममतांचे गप्प राहणे, बुरखा घालून इप्तारी पार्ट्या चोपणे, मुस्लीम गुन्हेगारांना ‘क्लीन चिट’ देणे, रोहिंग्या आणि बांगलादेशाच्या मुस्लिमांना अवैधपणे सर्व सरकारी सुविधा देणे, राज्य सरकारचा अधिकार वापरून प. बंगालमधील मुस्लिमांना ‘ओबीसी अ’चा दर्जा देणे, या सगळ्या गोष्टी लोकांनी अनुभवल्या. दुर्गामातेच्या आणि अन्य देवतांची मंदिर ताब्यात घेऊन तिथे नमाज पढणे, कालांतराने त्याची मशीद करणे, आजूबाजूच्या हिंदूंना हटवून तिथे बांगलादेशच्या मुस्लिमांना वसवले गेले. यावरही ममता गाढ झोपेत. आपले उत्सव, आपला धर्म इथल्या हिंदूंना पाळणे कठीण झाले. त्यामुळे आता प. बंगालमधले हिंदू ममता यांना निवडणुकीत हरवणार हे निश्चितच.
 
 
ममतांचा श्रीराम द्वेष तर जगजाहीर. ‘जय श्रीराम’ म्हणणार्‍यांना ममता ‘बंगालद्रोही’ म्हणतात. इतकेच नव्हे, तर प्रश्रू श्रीरामाचे नाव घेणार्‍यांवर कारवाई करण्याची भाषाही करतात. मंदिर आणि हिंदू उत्सवांवर येनकेन प्रकारे संक्रांत लादणार्‍या ममताला पाहून आता निवडणुकीच्या प्रचारात लोक उत्साहाने आणि अतिशय प्रसन्नतेने जय श्रीरामचे नारे देत आहेत. ममताच का? तृणमूल काँग्रेसचा कोणताही उमेदवार हिंदू वस्तीत गेला तर त्याचे स्वागत ‘जय श्रीराम’ या नावानेच होते.
 
 
प. बंगालच्या या निवडणुकीत ‘जय श्रीराम’ हे वचन परिवर्तन करणारे आहे. इथल्या लोकांना वाटते की, न जाणे किती शतक प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानावर बाबरी मशीद म्हणून मुस्लिमांचा कब्जा होता. पण, भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सातत्याने ‘मंदिर वही बनायेंगे’चे वचन दिले होते. त्यावेळी देशात काय, जगात वाटले होते की, आंतरराष्ट्रीय मुस्लीम दहशतवादाला आव्हान आणि देशातील मुस्लिमांना असंतुष्ट करणे हे कुणालाही जमण्यासारखे नाही. पण, भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि त्याने सगळ्यांच्या सहमतीने आणि कायद्याचा मदतीने प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येतच उभारायला सुरुवात केली. ‘बाबरी’ नावाचा अत्याचारी शब्द नामशेष केला. त्यापुढे तर मुस्लीम तुष्टीकरण करून हिंदूंना सापत्न वागणूक देणार्‍या ममता म्हणजे ‘किस झाड की पत्ती.’ त्यामुळे ७० टक्के हिंदूंना मनातून वाटते की, प. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार यावे आणि पुन्हा एकदा हिंदूंना स्वतंत्र आणि मनमुरादात जगता यावे. अर्थात, हे केवळ हिंदूंच्याच मनात आहे असे नाही, तर प. बंगालचे सुशिक्षित आणि मूळ प. बंगालचेचे असलेले ज्यांच्यावर रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचे संस्कार आहेत, ते मुस्लीमही ममता बॅनर्जी हरावी म्हणून दुवा करत आहेत. प. बंगालच्या जनतेचे हे म्हणणे कुणाला अतिशयोक्तीही वाटू शकते. पण, सध्याच्या निवडणुकांचे काही दाखले दिले की, समजेल जनता असे का म्हणते.
 
 
घटना क्रमांक १- तृणमूल काँग्रेसतर्फे कॉवशानी मुखर्जी ही बंगाली अभिनेत्री कृष्णानगरमधून निवडणूक लढवत आहे. तिने तिथे रॅली काढली आणि म्हणाली “बारीटे मा बोन अच्छे तो वोट ता भूजे सुने दिस, बीजेपी का एक डोम ना.” याचा अर्थ असा की, ‘तुम्ही भाजपला एक जरी मत दिलं, तरी लक्षात ठेवा, तुमच्या घरी लेकी, सुना आहेत. मग काय सांगू नका.’ अर्थात, हे पहिल्यांदाच म्हटले गेले असे नाही, तर याच विधानसभेचे पूर्व आमदार तपांशू म्हणाले होते की, “तृणमूल हरली तर तृणमूलचा प्रत्येक तरुण कार्यकर्ता तुमच्या घरातल्या लेकीबाळींवर बलात्कार करायला पाठवेन.” या अशा विधानांमुळे लोकं घाबरून तृणमूलला मत द्यायचे. पण, देशभरात आणि जगभरात पंतप्रधान मोदींचे कर्तृत्व पाहून जनतेला वाटते की, आपल्याला या भयग्रस्त वातावरणातून भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी बाहेर काढतील.
 
 
दुसरी घटना - प. बंगालच्या वनवासी क्षेत्रात बंगाली भाषक वनवासी समाजाची वस्ती आहे. वाचून आश्चर्य वाटेल की, इथल्या लोकांनी प्रथमच मतदान केले. त्यांच्याकडे मतदान कार्ड नव्हते असे नाही. पण, तरीही स्वातंत्र्यानंतर 2021 मध्ये त्यांनी मतदानाचा पहिल्यांदा हक्क बजावला. त्यांनी मतदान केले म्हणून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वस्तीवर हल्ला केला. आजपर्यंत कम्युनिस्ट किंवा तृणमूल या लोकांच्या निवडणूक कार्डावर स्वत: मतदान करायचे. त्यामुळे आताही या लोकांच्या नावावर डमी मतदान करण्याचे तृणमूलच्या कार्यकत्यांनी ठरवले होते. पण, तसे घडले नाही. कारण, बूथवर केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात होते. ते आपली रक्षा करतील, अशी या वनवासी लोकांची खात्री होती. त्यामुळे त्यांनी मतदान केलेच. अर्थात, या लोकांनी तृणमूलच्या दडपशाहीला विरोध केला. त्यामुळे आपण खात्रीने सांगू शकतो की, या लोकांनी कुणाला मतदान केले.
 
 
तिसरी घटना - आरामबागचे तृणमूलचे उमेदवार सुजाता मंडल आहेत. ते स्वत: अनुसूचित जातीचे आहेत. मात्र, आरामबागेतील अनुसूचित जातीच्या लोकांनी आपल्या मागण्या मांडल्यावर भरसभेत सुजाता मंडल म्हणाले, “मागासवर्गीय भिकारी असतात. त्यांना कितीही द्या. पण, ते कायमच मागत असतात.” या तृणमूलच्या उमेदवाराबद्दल ममता यांनी ‘ब्र’ अक्षर उच्चारले नाही. उलट सोयीस्कररीत्या याकडे दुर्लक्ष केले. मात्र, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त करत म्हटले की, “जातीप्रथा दूर व्हाव्यात म्हणून याच बंगालमध्ये अनेक समाजसुधारक झाले. तृणमूलच्या उमेदवाराने आणि पर्यायाने ममता दीदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा आणि वारशाचाही अपमान केला.” तृणमूलच्या सुजाता मंडलच्या या केकार वक्तव्याने तिथला अनुसूचित समाज दुखावला गेला आहे. कधी नव्हे तर या समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात भाजपच्या सभा आणि रॅलीला जात आहेत. भाजपच्या रॅलीत सभेत कुणी पैसे किंवा अन्नवाटप करणार की नाही, याचा विचार न करता समाजाचे लोक स्वतःच्या घरचा डबा घेऊन येत आहेत.
 
 
चौथी घटना - बंगालमध्ये बिहारी ऑफिसरची दिनाजपूर येथे हत्या झाली. कारण, ममता यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, बाहेरचे कुणीही सुरक्षादल आले तर त्याला घेराव घाला. नेत्याची आज्ञा मानून आपले चांगलेच तुष्टीकरण ममता बॅनर्जी करत आहेत, हा विचार करून एका समुदायाने या ऑफिसरची क्रूर हत्या केली. त्याच्या हत्येचे वृत्त ऐकून त्यांची वृद्ध आईही मरण पावली. प. बंगालमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश जन्मस्थान असलेल्या लोकाची संख्याही मोठी आहे. या ऑफिसरच्या मृत्यूने ही जनता संतापली आणि तृणमूलच्या विरोधात गेली आहे.
 
 
पाचवी घटना - ममता बॅनर्जींनी लालघर या नक्षली भागात जाऊन भाषण केले की, “नक्षली आमचे बंधू आहेत. त्यांनी आम्हाला मदत करावी.” हे बोलूनच ममता थांबल्या नाहीत, तर सी. महंतोवर अनेक गुन्हे दाखल असतानाही त्याला निर्दोष म्हणून बंगाल निवडणुकीच्या सुरुवातीलाच तुरुंगातून बाहेर काढले. सी. महंतो हा प. बंगालमध्ये नक्षली कारवायांचा म्होरक्या देशद्रोही कृत्य, अपहरण, खंडणी आणि खुनाचे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. या सी. महंतोला ममता यांनी ‘क्लीन चिट’ द्यायला लावली. का? तर बंदूक आणि हिंसेच्या जोरावर सत्ता काबीज करता येईल म्हणून. पण, झाले भलतेच. ‘एनआयए’ने सी. महंतोला तत्काळ अटक करून चौकशीसाठी प. बंगालच्या बाहेर नेले. नक्षल्यांच्या क्रूर अत्याचाराची कारकिर्द बंगाली माणूस विसरलेला नाही. या नक्षलींसोबत ममता यांचे गठबंधन जनतेला अचंबित करून गेले.
 
 
सहावी घटना - कम्युनिस्ट पार्टीने तिथे ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’शी युती केली आहे. या ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’चा अध्यक्ष आहे अब्बास सिद्दीकी. भारतात कोरोनाचा कहर होत असताना सिद्दीकीने त्याच्या चॅनलवरून म्हटले होते की, “कोरोनाच्या लाटेत ४०-५० कोटी भारतीय मेले पाहिजेत,” तर अशा सिद्दीकीशी कम्युनिस्ट पार्टीने युती केली. २०११ साली ममता या कम्युनिस्टांना हकलवूनच सत्तेत आल्या. मात्र, आता ममताने कम्युनिस्ट पार्टीला आणि ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ला युतीसाठी आवाज दिला आहे. ममता कम्युनिस्टांना म्हणाल्या की, “तुम्ही आता परत सत्तेत येणार नाही. सत्तेची चव चाखायची असेल, तर मला साथ द्या.” एक दशकापूर्वी कम्युनिस्टांना प्राणांतिक विरोध करणार्‍या ममता आता कम्युनिस्ट आणि ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’सारख्यांची मदत मागतायत, यावरून तृणमूलच्या जमिनीस्तरावरच्या कार्यकर्त्यांचा मोहभंग झाला आहे. म्हणजे जसे आपल्याकडे शिवसैनिक दोन-तीन दशकं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करत होते. मात्र, आता त्यांच्या साहेबांनी सत्तेसाठी त्यांच्याशीच युती केली, तसेच काहीसे तृणमूलच्या कार्यकर्त्यांसोबत झाले आहे.
 
 
याच निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना २४ तास निवडणूक प्रचार करण्यावर बंदी आली. कारण, ममतांनी मुस्लीम मतदारांना आवाहन केले की, मुस्लिमांनी कुणालाही मत देऊ नये. त्यांनी तृणमूललाच मतदान करावे. ममतांनी मुस्लिमांना आवाहन करण्यामागेही ठोस कारण आहेच. ३४ वर्षे कम्युनिस्ट सत्तेत होते. कारण, ३१ टक्के मुस्लिमांचा त्यांना आधार होता. त्याच व्होटबँकेवर ममतांनी डल्ला मारला. प. बंगालच्या २९४ विधानसभांपैकी ९० विधानसभांमध्ये मुस्लीम मतदारांचे वर्चस्व आहे. या 90 विधानसभांवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी ममता यांची ही खेळी होती. मात्र, त्यावेळी गृहमंत्री अमित शाह जाहीरसभेत म्हणाले की, “दीदी, तुम्ही मुस्लिमांनाच मत द्यायला सांगताय, याचा अर्थ बाकीच्यांची मतं तुम्हाला नको आहेत का? तुम्ही जे बोललात ते केवळ मुस्लीम बांधवांनी नाही, तर सगळ्यांनीच ऐकले आहे.” ममता यांच्या या कृतीमुळे प. बंगालचे गैरमुस्लीम समाजाचे लोक अस्वस्थ झाले आहेत.
 
 
सातवी घटना - कुचबिहारीचे भाजप पदाधिकारी पार्थो यांना ममता म्हणाल्या की, “तुम्ही प्रेत मोजत राहा. त्यांची वरातही आम्हीच काढू.” ममता यांच्या या वाक्यामुळे बंगालच्या भद्र समाजाने ममतांचा पाठिंबाच काढून घेतला.
 
 
आठवी घटना - हिंदू समाज आपल्यापासून दूर जात आहे हे पाहून ममतांनी मग म्हणायला सुरुवात केली की, त्या ब्राह्मण आहेत आणि त्यांचे गोत्र शांडिल्य आहे. यावर भाजपच्या गिरीराज यांनी म्हटले की, “रोहिंग्यांना वसवणार्‍या, दुर्गापूजेला रोखणार्‍या हिंदूंना अपमानित करणार्‍यांना आता हरण्याचे भय आहे म्हणून त्या गोत्र सांगत आहेत. शांडिल्य गोत्र हे सनातन आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे, मतांसाठी नाही.” यावर ममतांच्या तृणमूलचे मोईत्र म्हणाले की, “ममता का गोत्र रोहिंग्या आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. शेंडीवाल्या राक्षसांपेक्षा ते कितीतरी बरे. धर्म-संस्कृती हा बंगालचा आत्मा आहे.” मोईत्रने असे म्हणून हिंदूचा अपमान केला. संस्कृतीधर्माचा अमपान केला. रोहिंग्यांचा उदोउदो केला. मात्र, शांडिल्य गोत्र सांगणार्‍या ममता या यावर मूग गिळून गप्प बसल्या.
 
 
कोणतेही विधायक कार्य न करता, पंतप्रधान मोदींनी अमित शाह किंवा योगी आदित्यनाथांनी प. बंगालमधल्या रॅलीत तृणमूलला जे प्रश्न विचारले, त्याला समर्पक उत्तर न देता, ममता नक्षली आणि मुस्लीम समाजाकडे मतं मागत फिरत आहेत, तर दुसरीकडे ममतांचे कार्यकर्ते भिंतीवर चित्र काढतात, ज्यावर मोदींच्या डोक्यावर ममता पाय देऊन उभ्या आहेत किंवा मोदींच्या डोक्याला ममता फुटबॉलसारखे उडवत आहेत. यावर बिलकूल न संतापता मोदी म्हणाले, “दीदी, तुम्ही माझ्या डोक्यावर पाय ठेवा, मला चालेल, माझे मुंडके फुटबॉलसारखे उडवा, मला चालेल. पण, प. बंगालच्या विकासाला लाथ मारलीत, तर ते मी खपवून घेणार नाही. पश्चिम बंगालचा विकास हाच एक ध्यास आहे. असल परिवर्तन होणारच,” तर योगी आदित्यनाथ म्हणाले, “प. बंगाल हा भद्रतेसाठी, संस्कृतीसाठी ओळखला जातो. आज ममता दीदींनी याच बंगालमध्ये भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी, दहशत पसरवली आहे.” मोदी आणि योगींच्या या विधानाने बंगालमध्ये तृणमूलच्या दडपशाहीविरोधात वातावरण चांगलेच तापले.
 
 
असो. पश्चिम बंगालमध्ये कोणे एकेकाळी नक्षली असलेले, मात्र सध्या नक्षली विचार सोडून प. बंगालमध्ये आमदारकीच्या निवडणुकीत उभे राहिलले बिनॉय कुमार दास यांचे आजही समाजात चांगलेच वर्चस्व आहे. बिनॉय अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांनी नक्षली आणि इतर भागांतही प्रचार केला आहे की, “मी, मोदींचा चाहता आहे. ते ‘इंटरनॅशनल लिडर’ आहेत. काश्मीर आणि राम मंदिराचा मुद्दा त्यांनी सोडवला नाहीतर हा मुद्दा सुटणार होता का? पाकिस्तानला पण धुळीला मिळवले. या उलट ममता बॅनर्जींनी बंगालला आणि आम्हा बंगाल्यांना लुटले.” ६५१ कोटींचा मालक असलेल्या बिनॉय यांचे म्हणणे तिथल्या बहुसंख्याकांना पटले आहे. प. बंगालच्या निवडणुकीत ममता यांचा पाय तुटणे आणि ते नाटक कितीदा तरी सभेत उघड पडणे, तृणमूल आणि ममतांचे लोकांना धमकावणे, मोदींना शिव्याशाप देणे, या परिप्रेक्ष्यात मोदींचे ममतांना प्रेमाने ‘दीदी...ओ दीदी’ म्हणणे, निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांची हत्या, तसेच भाजप उमेदवारांवरील हल्ले याला हिंसेने उत्तर न देता, प. बंगालच्या जनतेशी राष्ट्रनिष्ठा आणि समाजकल्याणाबद्दलची चर्चा करणे, यामुळे प. बंगालचे लोक मोदींचे चाहते झाले आहेत. अशातच एक घटना घडली. मोदी मंचावर बसले असताना, कांथी परिसराचे भाजप अध्यक्ष अनुप चक्रवर्ती मंचावर आले आणि आशीर्वादासाठी मोदींच्या पाया पडू लागले. पण, त्यांनी पाया पडायच्या आतच मोदींनी त्यांना थांबवले आणि ते त्या कार्यकर्त्याच्या पाया पडले. का? तर भाजपमध्ये कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, आपण सगळे कार्यकर्ता! आपण एकमेकांचा सन्मान केलाच पाहिजे. मोदींची ही सहज केलेली कृती प. बंगालच्या मूळच्या सभ्य संस्कृतीला जागवून गेली.
 
 
दुसरे असे की, मोदी बांगलादेश भेटीला गेले, तिथे ते जशोरेश्वरी देवीच्या मंदिरात गेले. तसेच ते मतुआ समाजाच्या ओरकांडी येथील मंदिरातही गेले. मतुआ हे हरिश्चंद्र ठाकूर यांचे जन्मगाव. त्यांनी मतुआ महासंघाची स्थापना केली. मतुआ समाज त्यांना ‘देव’ म्हणून पूजतो. मतुआ समाजाचे अडीच ते तीन कोटी लोक प. बंगालमध्ये राहतात. जवळ जवळ ४०-५० विधानसभांवर त्यांचे वर्चस्व आहे. मतुआ समाजाच्या दैवताच्या जन्मस्थळी आजपर्यंत कुणीही भारतीय नेता, पंतप्रधान गेले नाहीत. पण, मोदी मतुआ समाजाच्या दैवताच्या गावी आणि त्यांच्या मूळ मंदिरातही गेले. प्रथेप्रमाणे यथासांग पूजा केली. त्यामुळे मतुआ समाज आनंदित आहे. मोदींना ते आपला नेता मानू लागले आहेत.
 
 
या सगळ्यात काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी पाचव्या निवडणुकीनंतर बंगालमध्ये पोहोचले. कारण काय, तर म्हणे चार निवडणुकांमध्ये काँग्रेसला मतदान होईल, अशी विधानसभा नव्हती. आताच्या निवडणुकीत त्या विधानसभा आहेत. मात्र, जाणकार म्हणतात की, राहुल गांधींना ममता बॅनर्जींना दुखवायचे नाही. कारण, पुढे मागे पंतप्रधान व्हायची संधी आली तर ममतांनी पाठिंबा द्यायला हवा. दुसरीकडे केरळमध्ये कम्युनिस्टांबरोबर सत्ता आहे. त्यामुळे इथे कम्युनिस्टांनाही दुखवून फायदा नाही. त्यामुळे राहुल गांधी या निवडणुकीमध्ये उत्साही नाहीत. मात्र, काही लोकांच्या मते, राहुल गांधी राज्यात प्रचार करणार म्हणजे भाजप सत्तेत येणारच! सध्या निवडणुकीत कोणतीचा आशा किंवा भीती नसणारा हा एकमेव पक्ष म्हणावा लागेल.
 
 
पण, काहीही म्हणा भाजपने प. बंगालमध्ये चांगलेच पाय रोवले आहेत. निवडणूक अंदाजाच्या मते, प. बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार आणि कुठे तरी हे तृणमूल आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मान्य केले आहे. फक्त तृणमूल, काँग्रेसचे मंत्री आणि ममता बॅनर्जी हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, “खेला होबे!” कसल्याही प्रकारे खेळ करून तृणमूलच सत्तेत येईल, असे ममतांना वाटते. पण, ममतांविरोधात जाणारे लोकमत, कधी नव्हे ते वाढणारे मतदान, युवा आणि महिलांचे स्वयंप्रेरणेने भाजपला समर्थन, यामुळे वाटते की, आज तृणमूलचाच ‘खेला होबे!’ नाहीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की,
 
 
“ ‘मॉ, माटी, मानूष’च्या नावाने सुरू झालेल्या तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, एका आईला सुवितो मुजूमदारांना अमानुष मारहाण केली. दुर्गामातेच्या पूजेवर बंधनं आणली. लोकांना घाबरवले, दहशत पसरवली. आता, टीएमसी खेला शेष होबे, विकास आरंभ होबे। बंगाल के हर घर से, हर मुंह से एक ही आवाज आ रही हैं... दो मई दीदी जाछे, असल परिवर्तन आछे।” पंतप्रधान मोदी प. बंगालच्या मनातले बोलले हे नक्कीच. शेवटी ‘असल परिवर्तन’ होणार असेच वाटत आहे.
 
परिवर्तन होणारच!
 
 
स्वातंत्र्यपूर्व काळात ‘वंदे मातरम्’ या वचनाने जसे जनतेत चैतन्य आले, तसेच आज प. बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ नामाने चैतन्य आले आहे. हे नाम परिवर्तन घडवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राष्ट्रनिष्ठ प्रतिमेमुळे प. बंगालची भ्रष्ट आणि दहशतवादी सत्ता संपुष्टात येणार. बंगालचा भाजप अध्यक्ष म्हणून भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या किंवा आमच्या उमेदवारांवर होणारे हल्ले, यामुळे आम्ही व्यथित होतो. पण, बंगाल वीरांची भूमी आहे. आम्ही अत्याचाराला पलटवून सत्तेत येणारच. यावेळी केंद्रीय सुरक्षा बल आल्यामुळे तृणमूलच्या गुंडागर्दी आणि दहशतीला आळा बसला आहे. ‘काका छीः छी’ म्हणणार्‍या ममता बॅनर्जींनी कोरोनाला कधीही गंभीरपणे घेतले नाही. पण, आता त्या कोरोनाचे कारण दाखवून राज्याच्या सगळ्या निवडणुका एकाच वेळी घ्यायला सांगतात. कारण सोपे आहे, एकदाच एकावेळी निवडणूक घेतली की, निवडणुकीत एकदाच धांदली करावी लागेल. असे हे धांदलीबाज सरकार आता जाणार आहे. २९४ पैकी २०० विधानसभा तरी आम्ही जिंकूच. परिवर्तन होणारच!
 
 
- दिलीप घोष, पश्चिम बंगाल अध्यक्ष भाजप
 
राज्यात राष्ट्रप्रेमी सरकार सत्तेत यायला हवेच!
 
 
रवींद्रनाथ टागोर, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषंचद्र बोस यांची ही भूमी आहे. इथे दडपशाही करणारी आणि धर्मविरोधी सत्ता कधीही सर्वकाळ सत्तेत राहणार नाही. आज तरुणांना शिकूनही नोकर्‍या मिळत नाहीत. नोकरीसाठी महाराष्ट्र, गुजरात, पंजाबला जावे लागते. तरुणांना आता प्रगती हवी आहे. बंगालचा विकास हवा आहे. गुंडागर्दी, बलात्कार यांचे प्रमाणही राज्यात वाढले आहे. पण, २०१६ पासून ममता सरकारने देशाकडे राज्यात घडलेल्या गुन्हेगारीची यादीच दिली नाही. त्यामुळे राज्यात गुन्हेगारीचे स्वरूप लपवले जाते. २०१८ मध्ये राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पण, दहशतीला घाबरून ३४ टक्के लोकांनी प्रत्यक्ष उमेदवारीचा अर्ज भरला नाही, तर मोबाईलवरून भरला. ममता बॅनर्जी यांनी एका दिवसात तीन हजार व्यक्तींची पोलीस दलात भरती केली होती. यावर न्यायालयानेही ठपका ठेवला. भरीस भर असे कळले की, हे तीन हजार नियुक्त लोक तृणमूलचे कार्यकर्ते होते. ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलीस झाले, ते त्यांच्या पक्षाच्या विरोधात काही कार्यवाही करतील का? राज्याच्या विकासासाठी आणि राज्यातील दहशतवाद संपण्यासाठी आता राज्यात राष्ट्रप्रेमी सरकार सत्तेत यायला हवे. परिवर्तन निश्चित आहे.
 
 
- सुमनचंद्र दास, राष्ट्रीय अभाविप सदस्य
 
आपलेपणाने काम करणार्‍या पक्षाची सत्ता हवी
 
 
ममता बॅनर्जींच्या तृणमूल सरकारच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. बलात्कार, मुलींचे अपहरण करणे, त्यांना दुसर्‍या राज्यात वेश्याव्यवसायाला प्रवृत्त करणे, त्यांना विकणे, असे धंदे राजरोस सुरू आहेत. त्यातच तृणमूलची गुंडागर्दी वाढली आहे. आम्हाला संरक्षण हवे आहे. आमची सभ्यता सांभाळायची आहे. त्यामुळे आम्हाला समाजासाठी, देशासाठी आपलेपणाने काम करणार्‍या पक्षाची सत्ता हवी आणि असा तृणमूल पक्ष अजिबात नाही.
 
 
- संगीता कार, विद्यार्थिनी
@@AUTHORINFO_V1@@