मुंबई : अँटिलीया स्फोटक प्रकरणाच्या सखोल चौकशीतून रोज नवीन खुलासे होत आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्या, संशयित गाडीचा शोध, संशयित कार मालक मनसुख हिरनची हत्या आणि या सर्वामागे हात असणारे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा सहभाग यापूर्वीच उघडकीस आले आहे. आता याप्रकरणात एक बार डान्सर ही केस सोडवण्यातील महत्वाचा पुरावा ठरली आहे. महाराष्ट्रात दहशतवादविरोधी पथक याप्रकरणात तपस आकारत असताना सर्वप्रथम यामहिलेपर्यंत पोहोचले होते.
४ मार्च रोजी मनसुख हिरनच्या मोबाइल फोनवर एक व्हॉट्सअॅप कॉल आला होता. हा कॉल ट्रेस करून, मुंबई पोलिस त्या बार डान्सरपर्यंत पोहोचले. याचवेळी क्रिकेट बुकी गोरेला अटक करण्यात आली. ४-५ मार्च दरम्यानच मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला आहे. त्यादिवशी पोलिसांनी सुमारे ९००० वापरकर्त्यांच्या फोनचा डेटा शोधला होता. मुंब्रा खाडी व मुंबईच्या रेती बंदर परिसरातील खाडीजवळून गेलेल्या सर्व लोकांचा हा डेटा होता.
यासर्व प्रकारात आता मुंबई पोलिसांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या वाझे एनआयएच्या ताब्यात आहे. मनसुखच्या व्हॉट्सअॅप कॉलची तपासणी केल्यानंतर पोलिसांना लक्षात आले की, गुजरातमधील भुज येथून खरेदी केलेल्या क्रमांकावरून मनसुख हिरन यांना एक फोन आला होता. नरेश गोरेला अशी १४ सिमकार्ड विकली असल्याचे दुकानदाराने चौकशीत सांगितले. गोरेने त्याच्याकडील कार्डपैकी एक कार्ड एका बार डान्सरला दिले होते. एटीएसने गुजरातमधील एका हॉटेलमधून नरेश गोरे आणि विनायक शिंदेला ताब्यात घेतलं. महाराष्ट्र गृहखात्याच्या सूचनेनंतर वाजे यांना आयपीसीच्या कलम ३११ (२) अन्वये सचिन वाझेला पोलीस दलातून बरखास्त केले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सचिन वाझेला बरखास्त करण्याची तयारी सुरू
मुंबई विभागातील तळोजा तुरूंगात अटकेत असलेल्या निलंबित एपीआय सचिन वाझेला पोलिस खात्यातून काढून टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. अँटिलीया प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. गृहखात्याच्या शिफारशीनंतर मुंबई पोलिस त्याला पुढील १ ते २ दिवसांत पोलीस खात्यातून बरखास्त करू शकतात. त्याच्यावर कलम ३११ (२) नुसार खटला चालविला जाईल.