पुन्हा लॉकडाऊन? : उद्धव ठाकरेंचं ८.३० वाजता फेसबूक लाईव्ह!

    13-Apr-2021
Total Views |

cmo _1  H x W:


मुंबई :
राज्यातील कोरोनाचा फैलाव वाढत असून सध्या राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. याचविषयी आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रात्री ८.३० वाजता ते जनतेशी संवाद साधतील .

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेखयांनी आज माध्यमांना सांगितले होते.


लॉकडाउनची घोषणा आज झाली तरी ते प्रत्यक्षात लागू कधी होणार याबाबत अद्याप संभ्रम आहे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासोहब आंबेडकर जयंती झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळपासून लॉकडाउन लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंढरपूर शहरातील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचारही संपणार आहे. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळपासून लॉकडाउन लागू होईल, असं बोललं जात होते आहे. १५ एप्रिल ते ३० एप्रिल असा लॉकडाउनचा कालावधी असू शकतो. १ मे रोजी सरकारी सुट्टी असल्याने २ मे पासून पुन्हा राज्यातील परिस्थिती पूर्ववत करता येऊ शकते. मात्र, विरोधकांची तयारी न दर्शविल्यास लॉकडाउनचा कालावधी कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.