सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा विस्फोट

    12-Apr-2021
Total Views |

SC_1  H x W: 0



नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होताना आता दिसतोय. सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्यामुळे यापुढे सरन्यायाधीशांसहीत सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठं 'वर्क फ्रॉम होम' करणार आहेत. देशातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता सरन्यायाधीशांसहीत सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या घरातूनच प्रकरणांवर सुनावणी करणार आहेत. सोबतच, संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाचा परिसर सॅनिटाईझ करण्याचे काम सुरू आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या समोर आल्यानंतर कोर्टरुमसहीत संपूर्ण कोर्ट परिसर सॅनिटाईज करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे, आजपासून (सोमवार) सर्व बेंच निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने कामकाज सुरू करतील.