संजूची राजस्थान करणार का राहुलच्या पंजाबवर मात?

    12-Apr-2021
Total Views |

Punj_1  H x W:
 

मुंबई : आयपीएलच्या चौथ्या दिवशी संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स देणार के. एल. राहुलच्या किंग्स इलेवन पंजाबला टक्कर. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार हे भारताचे असल्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. २०२०च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ हा आठव्या स्थानावर होता, त्यामुळे विजयी सलामीसाठी हा संघ आतुर आहे. तसेच, पंजाबच्या संघात सर्वच धडाकेबाज फलंदाज असून पहिला विजय हेच संघाचे लक्ष असेल.
 
 
रॉयल्सला चिंता आहे कारण त्यांचे प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर या सामन्यात नसतील. तसेच यांचा नवा कर्णधार संजू सॅमसन कशी जबाबादारी सांभाळणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंजाबबाबत बोलायचे झाल्यास त्यांचा फलंदाजीचा क्रम मजबूत दिसत आहे. दरम्यान, मुंबईच्या पिचवर फलंदाजांची चन असणारआहे. मात्र पंजाबला आपल्या गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल.
 
 
पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत २१ सामने झाले. यात रॉयल्सचे पारडे जड होते. त्यांनी १२ सामने जिंकले तर पंजाबने ९ सामने जिंकले. गेल्यावर्षी राजस्थान रॉयल्सने पंजाबला दोनवेळा मात दिली होती. तो सामना कोण विसरेल ज्यात रॉयल्सने राहुल तेवतियाच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर २२४ धावांचे लक्ष्य गाठले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात रॉयल्सने १७.३ ओव्हरमध्ये १८६ धावांचे लक्ष्य गाठले होते.