"लोक उगाच रांगेत उभे राहतात": रेमडेसिवीरविषयी भुजबळांची प्रतिक्रिया

    10-Apr-2021
Total Views |



CHG_1  H x W: 0



रेमडेसिवीरसाठी नाशिकमध्ये उसळणार्‍या गर्दीवरून छ्गन भूजबळ म्हणाले, काही लोकानांच गरज, बाकीचे लोक उगाच रांगेत उभे राहतात.....


प्रतिनिधी : सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवडयामुळे लोकांच्या मेडीकलबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. राज्य सरकारच्या नेत्यांना मात्र याविषयी केंद्राला दोष देता येत नसल्यामुळे पंचायत झाली आहे. नागरी पुरवठा मंत्री छ्गन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात लोकांनी उस्फूर्तपणे सरकरविरोधात घोषणाबाजी केली. त्यावरून छ्गन भूजबळ माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "लोक इंजेक्शन घेऊन ठेवूया म्हणून उगाच रांगेत उभे राहतात. काही लोकांना खरोखर गरज आहे.

छ्गन भूजबळ यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यभरात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असून त्याकरिता केंद्र सरकारला दोष देता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारचे नेत्यांची पंचायत झाली आहे. अशात नाशिक, नागपुर, पुणे येथे नागरिकांच्या रेमडेसिवीरसाठी लांबच लांबा रांगा लागल्या आहेत. त्यावरून प्रतिक्रिया देताना छ्गन भूजबळ म्हणाले की, लोक उगाच रांगेत उभे राहतात. सर्वांना गरज नाहीये पण आपण घेऊन ठेऊया म्हणून लोक रांगेत उभे राहतात, असही भूजबळ म्हणाले.


राज्य सरकारचे नेते लसीवरुन केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी तर रांगा लागतात तरीही त्याविषयी राज्य सरकारचे नेते बोलायला तयार नाहीत. अशात छ्गन भूजबळ यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.