
बलात्काराचा गुन्हा दाखल करा पीडितेची मागणी
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महिला अत्याचाराचे गंभीर आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांवर लागले.एकामागोमाग एक प्रकरण शांत होत नाही त्यात आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा आणखी एक नेत्याने परभणी येथे एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
“माझे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. मी तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात” असा दावा पीडितेने केला आहे. राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप त्या पीडितेने तृप्ती देसाईसमवेत पत्रकार परिषद घेत केला.
बलात्काराचा आरोप झालेले राष्ट्रवादीचे कोण ?
39 वर्षीय राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे.सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देखील होता.परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक आहे.परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.5.3 कोटी रुपयांची संपत्ती, तर 8.7 लाखांचे उत्पन्न, प्रतिज्ञापत्रात उल्लेख त्यानी केला आहे.राजेश विटेकर पदवीधर असून शेती व्यवसाय असल्याचाही उल्लेख आहे.
या अगोदर या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप
यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. तर त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली.त्यांनंतर हे प्रकरण शांत होत नाही त्यातच आणखी एक नेत्यांनी असं कृत्य केल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी नेते नक्की करतायत तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.