निलंबित झालेले सचिन वाझे शिवसेनेची सत्ता आल्यावर रुजू कसे झाले ?

    06-Mar-2021
Total Views |

sandeep deshpande_1 

 

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि त्यानंतर या प्रकरणातील मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर भूमिका संशयास्पद मानली जात आहे. याबद्दल मनसेचे नेते संदीप देशपांडेही वक्तव्य केले आहे. 'शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात ?', असे टि्व्ट त्यांनी केले आहे.
 
 
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया घराबाहेर संशयास्पद कार आढळल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. शुक्रवारी कळवा खाडीत एक मृतदेह आढळला. मनसुख हिरेन यांचा हा मृतदेह आहे. काही दिवसांपूर्वी अँटीलिया बाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओचे ते मालक होते. या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल मनसेचे नेते यांनी देखील संशय व्यक्त केला आहे. त्यांनी टिव्ट करुन म्हटले आहे की, 'श्री सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात ???'
 
 
 
हाराष्ट्र पोलीस दलात वाझे सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणजे एपीआय या महत्वाच्या पदावर आहेत. तसेच मुंबई क्राईम ब्रांचच्या 'क्राईम इंटेलिजन्स युनिट' प्रमुख म्हणूनही ते कर्तव्यावर आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी विश्वातील गोपनीय माहिती मिळवून त्या रोखण्याचे क्राईम ब्रांच युनिटकडे असते. मुंबईत ख्वाजा यूनुस अटकेत असताना झालेल्या मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांनी २००८ मध्ये राजीनामा दिला होता. यूनुसला हत्याप्रकरणात २००४ रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी अटकेनंतर वाझेंना बडतर्फ करण्यात आले होते. वाझेवर युनूसच्या अटकेनंतर झालेल्या मृत्यू प्रकरणातील माहिती लपवण्याचा आरोप होता. निलंबित असताना वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी पक्षात महत्वाच्या पदांवर काम केले आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या शपथविधीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समितीने वाझेंचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. वाझे १६ वर्षांनी पुन्हा ७ जून २०२० रोजी पुन्हा सेवेत रुजू झाले होते. मुंबई पोलीस क्राईम इंटेलिजेंस युनिटचे (CIU) प्रमुख बनवण्यात आले.