अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

    05-Mar-2021
Total Views |

mukesh _1  H x



मुंबई : रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया घराबाहेर संशयास्पद कार आढळल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. शुक्रवारी कळवा खाडीत एक मृतदेह आढळला. मनसुख हिरेन यांचा हा मृतदेह आहे. काही दिवसांपूर्वी अँटीलिया बाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओचे ते मालक होते. अधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ठाण्यातील व्यापारी असलेले मनसुख यांचा क्लासिक मोटार्स ही फ्रेन्चायझी चालवतात. ठाण्याच्या डीसीपी यांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे म्हटले होते. मात्र, ज्या प्रमाणे मृतदेहाचे हात बांधण्यात आले त्यानुसार ही हत्या असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
 
 
 
विचित्र योगायोगावर देवेंद्र फडणवीस यांचे प्रश्नचिन्ह
 
मनसुख यांचा मृतदेह मिळाल्याच्या एका तासापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित केला होता. ज्यावेळी अँटीलियाकडे गाडी मिळाली त्या ठिकाणी सचिन वझेच्या नंतर क्राईम ब्राच पोहोचली. गाडीच्या क्रमांकावरून सीडीआर काढण्यात आला त्यावेळी तो गेल्या वर्षी ५ जून आणि १५ जुलै रोजी सचिन वझेशी चर्चा केल्याचे म्हटले जात होते. मनसुख आणि सचिन वझे दोघेही संपर्कात होते. आता गाडीचा मालक म्हणतो की गाडी चोरी झाली होती, त्यानंतर सचिन वझे घटनास्थळी लगेचच पोहोचतात. हा इतका योगायोग, कसा शक्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
 
 
यापूर्वीही वादात आले आहेत सचिन वझे
 
मुंबईत ख्वाजा यूनुस अटकेत असताना झालेल्या मृत्यू प्रकरणात सचिन वझे यांनी २००८ मध्ये राजीनामा दिला होता. यूनुसला हत्याप्रकरणात २००४ रोजी अटक करपण्यात आली होती. त्यावेळी अटकेनंतर वझेंना बडतर्फ करण्यात आले होते. वझेवर युनूसच्या अटकेनंतर झालेल्या मृत्यू प्रकरणातील माहिती लपवण्याचा आरोप होता. उद्धव ठाकरे सरकारच्या शपथविधीनंतर वझे १२ वर्षांनी पुन्हा ७ जून २०२० रोजी पुन्हा सेवेत रुजू झाले होते. मुंबई पोलीस क्राईम इंटेलिजेंस युनिटचे (CIU) प्रमुख बनवण्यात आले. वर्ष १९९० बँच पोलीस अधिकारी वझे यांच्या कार्यकाळात एकूण ६३ चकमकीत सहभागी होते. सचिन वझे तेच आहे ज्यांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या घरातून अटक केली होती.
 
 
 
अंबानींच्या घराबाहेर मिळाली होती विस्फोटकांनी भरलेली कार
 
मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाबाहेर दोनशे मीटर दूर एक कार एसयुव्ही जिलेटीनच्या २० काड्या आढळल्या होत्या. SUV वर बोगस क्रमांक आढळला होता. CCTV छायाचित्रणाच्या आधारे अँटेलिया बाहेर २४ फेब्रुवारी रात्री १ वाजता पार्क करण्यात आली होती. पूर्वी हीच कार १२.३० वाजता हाजी अली जक्शनवर पोहोचली होती. या ठिकाणी १० मिनिटे ही कार उभी होती. ही कार विक्रोळीहून चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचा चेसिस क्रमांक बिघडवण्यात आला होता. मात्र, पोलीसांनी त्याच्या खरा मालकाचा शोध लावला होता. क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांच्या मते, "कारच्या मालकाचे नाव मनसुख हिरेनच्या दाव्यानुसार, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते ठाण्याला घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात गाडी बंद पडली. त्यामुळे गाडी ऐरोली ब्रिजजवळ उभी केली होती. दुसऱ्या दिवशी गाडी आणायला पोहोचले तेव्हा त्यांना गाडी मिळाली नाही. त्याची तक्रार पोलीसांतही करण्यात आली होती."