'नाणार' खर्च तर होणार! रिफायनरी विरोधासाठी खर्च झाले ४ कोटी ३३ लाख

    05-Mar-2021
Total Views |
nanar _1  H x W

रत्नागिरी : नाणार रिफानरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. रिफायनरी प्रकल्प विरोधासाठी ४ कोटी ३३ लाख ८ हजार खर्च केल्याची कबुली दिली आहे. ही रक्कम राजापूरच्या जनतेने वर्गणी काढून जमविली असल्याचा दावा त्यांनी या व्हीडिओतून केला आहे. रिफायनरीच्या विरोधासाठी कुणी प्रकल्प विरोधक शक्ती कार्यरत होत्या या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या एनजीओची चौकशी करण्याचीही मागणी केली जात आहे.