'सरकारला लाज शरम नाही' : प्रवीण दरेकर

    04-Mar-2021
Total Views |

pravin darekar_1 &nb


मुंबई :
औरंगाबाद महानगरपालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना सेंटरमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मंगळवारी मध्यरात्री एका डॉक्टरने कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यामुद्द्यावरून अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक होत प्रश्न उपस्थित केला व राज्यातील वाढते महिला अत्याचार पाहता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.


औरंगाबाद येथील कोरोना सेंटरमध्ये डॉक्टरने महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णाचा नंबर घेऊन डॉक्टर अवेळी फोन करत असल्याचा आरोप देखील पीडितेने केला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज देतो असे आमिष दाखवून डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली होती. मात्र, महिलेने नकार दिल्याने या डॉक्टरने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध करत आरडाओरड केली. त्यानंतर कोविड केअर सेंटरमध्ये गोंधळ उडाला. या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टराला मारहाण केली. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. यासंपूर्ण घटनेवर चिंता व्यक्त करत भाजप नेत्यांनी राज्यातील महिला अत्याचारावर विधानसभेत आवाज उठवू असे म्हटले.

महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. : प्रवीण दरेकर

मेहबूब शेख प्रकरणात सरकारने अद्याप कोणतीच कारवाई केली.औरंगाबाद कोविड सेंटरमध्ये डॉक्टरनेच बलात्कार करण्यासाठी बळजबरी केली गेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे .या सरकारला लाज नाही शरम नाही .सरकार चे स्वतःचे मंत्री अशा नालायक कृत्यात सहभागी आहेत .मग जनतेला कसं काय हे सरकार न्याय देणार ? असं सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, राज्यात आज कायदा सुव्यव्यवस्था पूर्ण पणे फोल आहे .हे सरकार पोलीस बदल्यांमध्ये पैसे घेते त्यामुळे पोलीस सुद्धा काम करत नाही. ते कोणत्या हिशोबाने काम करणार तसेच या महिला अत्याचाराच्या घटना रोज घडत असताना नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही दोन्ही सभागृहात करणार असल्याचे विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवेळीं दरेकर यांनी औरंगाबादच्या घटनेवर बोलताना सांगितले.