जगाला मृत्यूच्या दरीत लोटणाऱ्या चीनला 'WHO'ची क्लीन चीट

    30-Mar-2021
Total Views |

Corona_1  H x W
 



नवी दिल्ली
: कोरोनाच्या निर्मितीवरून आता जागतिक आरोग्य संघटनेने चीनला क्लीन चीट दिली आहे. जगभरात कोरोनाचा प्रसार होऊन आता एक वर्ष झाले. जगभरामध्ये मृत्यूचे तांडव करणाऱ्या कोरोनाचा प्रसार नक्की कुठून झाला? याचा तपास जागतिक आरोग्य संघटनेने केला.



यावरून चीनमधील वुहान शहरातील मांस बाजारातून कोरोना जगभरात पसरला असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र, त्यास योग्य असे पुरावे अद्यापही मिळाले नव्हते. याच सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहान शहरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार झालेला नाही, असा निष्कर्ष मांडला आहे.
 
 
 
'कोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेत चीनने केली आणि जगभर हा विषाणू पसरला,' असा अंदाज अनेक देशांनी व्यक्त केला होता. अमेरिकेने हा विषाणू ‘चिनी व्हायरस’ असल्याचे अनेक वेळा म्हटले आहे. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेनेच चीनला क्लीन चीट दिली आहे.



यावरून आता जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यावरून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅण्टोनी बिल्कीन यांनी टीका केली आहे की, "ज्या पद्धतीने या अहवालात निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते पाहता चीनने अहवाल लिहिण्यास मदत केली असावी." असे म्हटले आहे.