“..अन्यथा मुंबईत दरदिवशी १० हजार कोरोना रुग्ण आढळतील’,

    30-Mar-2021
Total Views |


COVID_1  H x W:



मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे याचा ताण मुंबई प्रशासनावर पडत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीबाबत पालिका आयुक्तांनी माहिती दिली आहे. महापालिका आयुक्त म्हणाले की मुंबईत दररोज ५० हजार कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. ज्यामध्ये जवळपास सात हजार नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत दररोज ६० हजार कोरोना चाचण्या घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 
 
कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली गेली तर, मुंबईत दिवसाला नऊ ते दहा हजार रुग्ण वाढतील. त्यामुळे याचा परिणाम नैसर्गिकरित्या प्रशासनावर पडेल. पण जरी दिवसाला १० हजार नवे रुग्ण आढळले, तरी तो ताण मुंबई सहन करण्याची मुंबई महापालिकेची क्षमता असल्याचं त्यांने सांगितलं. या परिस्थितीत शहरातील रुग्णालये सज्ज करण्यात आली आहेत..
मुंबई सध्या एकूण १३०००  खाटा उपलब्ध असून त्यापैकी साडेनऊ हजार खाटा वापरात आहेत. त्यातही दीड हजार रुग्ण हे मुंबई बाहेरील म्हणजेच एम एम आर विभागातील आहेत अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.