
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोप झाल्याने नव्या वादात सापडलेले शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय गावडे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच न्यायालयाने १५ दिवसांत पोलिसांसमोर हजर रहावे आणि जामिनासाठी नव्याने अर्ज करावा, असा आदेश दिला आहे, त्यामुळे गावडेला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे.
सध्या गावडे हे त्यांच्यावरील विविध गुन्ह्यंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे बाहेर आहेत. त्यातच त्यांचा संबंध या हिरण मनसुख प्रकरणात आल्याने पुन्हा एकदा त्यांचा अडचणीत वाढ होणार आहे व त्याला अटक होईल अशी सद्यस्थितीत आहे. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या गावडेवर खंडणी उकळणे, बलात्कार, धमकावणे, फसवणूक असे विविध प्रकारचे १० गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्याखाली त्यांना २०१७ साली अटक करण्यात आली होती. दोन वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने गावडेला सशर्त जामीन दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी नवा आदेश दिला आहे.
त्यामध्ये न्यायालयाने पुढच्या १५ दिवसांत पोलिसांना शरण जावे, त्यांचा विशेष अर्ज फेटाळून लावत उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करणार नाही. जामिनासाठी नवीन अर्ज दाखल करा, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. नालासोपऱ्यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि सभागृहातील गटनेता धनंजय गावडे याला सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खंडणीसह अनेक गुन्हे असलेला आणि सचिन वाझेचा साथीदार असलेल्या गावडेची अटक आता अटळ आहे. -
आ. अतुल भातखलकर, भाजप नेते