धक्कादायक! मुंबईत 'हे' ८ कोरोना विभाग 'हॉटस्पॉट'

    29-Mar-2021
Total Views |
CORONA HOTSPOT _1 &n




मुंबई :  मुंबईत कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असताना आठवडाभराच्या रुग्णसंख्येचा विचार केला तर मुंबईतील आठ विभाग कोरोना हॉटस्पॉट ठरले आहेत. विशेष म्हणजे येथील रुग्णदुपटीचा कालावधीही ५० दिवसांहून खाली घसरला आहे.
 
वांद्रे पश्चिम (एच वेस्ट) येथे सोमवार २२ मार्च ते रविवार २८ मार्च या आठवडाभरादरम्यान १८२२ रुग्ण सापडले. त्यामुळे तेथील रुग्णदुपटीचा वेग ३९ दिवसांपर्यंत खाली घसरला आहे. चेंबूर (एम वेस्ट) पश्चिम भागात १,४३५ रुग्ण सापडले असून रुग्णदुपटीचा वेग ४१ दिवसांपर्यंत खाली आला आहे. अंधेरी पश्चिम (के वेस्ट) -२७९५ (४६), अंधेरी पूर्व (के ईस्ट) - २३५३ (४७), घाटकोपर (एन) - १९१७ (४७), माटुंगा (एफ एन) -१५१९(४८), तर चेंबूर (एम वेस्ट) येथे आठवडाभरात १२०३ रुग्ण सापडले असून रुग्णदुपटीचा वेग ४८ दिवसांपर्यंत खाली घसरला आहे.
 
 
दरम्यान बोरिवली (आर सेंटर) येथे आठवडाभरात १९५६ रुग्ण सापडले असून तेथील रुग्णदुपटीचा कालावधी 65 दिवसांपर्यंत घसरला आहे. तर कांदिवली (आर साऊथ) - १७९०(६५), मालाड (पी नॉर्थ) - १८६९ (५७), तर मुलुंड येथे (टी विभाग) १९०० रुग्ण सापडले असून रुग्णदुपटीचा वेग ५२ दिवसांवर घसरला आहे.
 
 
होळीदिवशी रविवारी अंधेरी (प.) भागात ४८५ रुग्ण सापडले, तर अंधेरी (पूर्व) भागात ४४२ रुग्ण सापडले. मालाड (पी-एन) - ४०८, गोरेगाव (पी-साऊथ) ३८९, बोरिवली (आर-साऊथ)- ३८३, मुलुंड (टी) - ३६३, घाटकोपर (एन) - ३३९ , वांद्रे पश्चिम (एच वेस्ट) - ३३५ आणि भांडुप (एस) विभागात ३१८ रुग्ण सापडले. ही रुग्णवाढ अशीच चालू राहिल्यास मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करतेय म्हटल्यास वावगे ठरणार नाही.