"२ महिन्यांच्या आत महिलांची सैन्यामध्ये स्थायी नेमणूक करावी"

    26-Mar-2021
Total Views |


indian army_1  



महिला अधिकाऱ्यांना दिल्या जाणार्या तात्पुरत्या नेमणुकीवर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश



नवी दिल्ली:
 महिलांना येत्या दोन महिन्यांच्या आत सैन्यदलांमध्ये स्थायी नेमणूक देण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी दरम्यान दिले. भारतीय सैन्यदलांमध्ये यापूर्वी महिला अधिकार्‍यांना स्थायी नेमणूक न देता तात्पुरती नेमणूक दिली जात होती.



मात्र, गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने महिलांनाही स्थायी नेमणूक देण्यात यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतरही महिलांना आवश्यक त्या नेमणुका देण्यात आल्या नसल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने त्यावर निर्णय दिला आहे.



सदर निर्णयानुसार एक महिन्यात महिलांना स्थायी नेमणूक देण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि पुढील दोन महिन्यांत महिला अधिकार्‍यांना स्थायी नेमणूक देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.