लालबाग उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद

    25-Mar-2021
Total Views | 35

lalbag flyover_1 &nb


उड्डाणपूल २४ मार्चपासून १५ जूनपर्यंत वाहतूकीसाठी बंद

मुंबई : मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मध्य मुंबईतील लालबाग आणि दक्षिण मुंबईतील भायखळा विभागाला जोडणारा लालबाग उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी दि.२४ मार्चपासून १५ जूनपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
सदरील पुलाचे पिलर्सच्या बेयरिंग आणि सांधे दुरुस्तीचे काम पालिकेकडून पुढील तीन महिने पुर्ण केले जाईल. त्यामुळे १५ जूनपर्यंत हा पुल वाहतुकीसाठी बंद राहिल तसेच या उड्डाणपुलावरून होणारी वाहतुक पुढील कालावधीसाठी दिलेल्या निर्धारित वेळेत लालबाग उड्डाणपुलाखालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वळवण्यात आली असल्याची माहिती मुंबई दक्षिण विभागाचे वाहतूक पोलीस उपआयुक्त योगेश कुमार यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे.


परळ उड्डाणपूल आणि परेल टीटी जंक्शनच्या दिशेने दक्षिण मुंबईकडे जाणार्या वाहतुकीसाठी, तसेच भायखळा मार्केटकडून राणीच्या बागेसमोरुन उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक २४ मार्चपासून १५ जूनपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली आहे.


त्यानुसार, परळ पूल आणि परळ टी.टी. जंक्शनकडून येणारी आणि भायखळ्याकडे जाणारी वाहतूक लालबाग उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरुन भायखळ्याच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. तसेच भायखळा मार्केटकडून लालबाग उड्डाणपुलाकडे जाणार्या वाहतुकीला देखील पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार ही वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने परळच्या दिशेने जाईल.
सदरील वाहतुक बदलांची माहिती वाहनचालकांना देण्याकरिता प्रशासनामार्फत रस्त्यावर दिशादर्शक फलक लावले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121