सचिन वाझे आणि वसुली प्रकरणातील महत्त्वाची बातमी
नवी दिल्ली : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणाऱ्या परमवीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर बुधवारी सकाळी सुनावणी पार पडली. अनिल देशमुख यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश देत परमवीर सिंह यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सिंह हे पुन्हा तातडीने उच्च न्यायालयात जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनिल देशमुख यांना प्रतिवादी का केले नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच याचिका मागे घेण्याची मुभाही देण्यात आली आहे. आजच्या सुनावणीमुळे राज्य सरकारला काहीसा दिलासा मिळाला असला, तरीही परमवीर सिंह हे पुन्हा उच्च न्यायालयात जाऊन गृहमंत्र्यांना पुन्हा एकदा धक्का देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण गंभीर आहे. मात्र, आधी उच्च न्यायालयात सुनावणी व्हावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे.
न्या. संजय किशन कौल आणि आर. सुभाष यांच्या खंडपीठापुढे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. १७ मार्च रोजी त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावररून हटवल्याच्या विरोधात त्यांनी ही दाद मागितली होती. घटनेच्या १४ आणि २१ कलमानुसार त्यांनी ही दाद मागितली. हे प्रकरण गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणी उद्या उच्च न्यायालयात सुनावणी व्हावी, अशी याचिकाकर्त्यांची इच्छा होती त्यानुसार ते या प्रकरणी आजच मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू शकतात.