ब्रेकींग! सचिन वाझे प्रकरणात पाच महत्वाचे खुलासे

    23-Mar-2021
Total Views |

SACHIN _1  H x
 
 
 
 
वाझेंच्या स्कॉर्पिओची एनआयएतर्फे तपासणी
 
अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात ज्या गाडीचा वापर करण्यात आला. ती कार एनआयए कार्यालयात आणण्यात आली. या स्कॉर्पिओ गाडीची पुण्याच्या टीमकडून तपासणी करण्यात आली.
 
'व्हॉल्वो' कार वाझेंच्या पार्टनरची
 
दमणमध्ये सापडलेली वाझेंची कार सचिन त्यांचा पार्टनरची होती, अशी प्रार्थमिक माहिती मिळाली आहे. एटीएसने दमण येथील एका फॅक्ट्रीत सोमवारी छापा मारला होता. तिथे त्यांना ही कार सापडली. दमणमध्ये सापडलेल्या या कारचा खरा मालक आणि वाझेंच्या दरम्यानच्या कनेक्शनचाही एटीएस शोध घेत आहे. दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेला विनायक शिंदे हा अँटालिया स्फोटक प्रकरणातील एक आरोपी असल्याचं तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
 
 
प्रिंटर तपासणीसाठी प्रयोगशाळेत
 
एनआयएने विनायक शिंदेच्या फ्लॅटमधून एक प्रिंटर जप्त केला. धमकावणारे पत्रं लिहिण्यासाठी याच प्रिंटरचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अँटालियाच्या स्फोटकांच्या कारमध्ये सापडलेलं पत्रे याच प्रिंटरद्वारे प्रिंट करण्यात आल्याचा एनआयएला संशय आहे. एनआयएने हा प्रिंटर जप्त करून चौकशीसाठी पाठवला आहे.
 
 
बनावट आधारकार्ड, पंचतारांकित हॉटेलात मुक्काम
 
वाझेंच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. वाझेनी बनावट आधारकार्ड दाखवून पंचतारांकीत हॉटेलात राहत होते. वाझेंकडून बनावट आधारकार्डही जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाझे 16 फेब्रुवारी रोजी हॉटेलात थांबले होते. त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएने जप्त केले आहेत. बनावट आधारकार्ड दाखवून हॉटेलात राहण्याचे कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.
 
 
हप्ते वसुलीची डायरी हाती?
 
वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.