'ट्रायडेंट'मध्ये सचिन वाझेकडे होत्या पाच बॅग्स

    23-Mar-2021
Total Views |



vaze_1  H x W:


मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केलेल्या वाझेचा पाय आणखी खोलात


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे काय ओसामा बिन लादेन आहे का?,असा प्रश्न विचारला होता. त्याच वाझेंच्या बाबतीत आता पुरावे मात्र धक्कादायकरित्या समोर येत आहेत. 'एनआयए'कडून सुरू असलेल्या तपासात 'ट्रायडेंट हॉटेल'चे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये सचिन वाजेच्या सोबत पाच बॅग्स दिसत आहेत.


सचिन वाझे खोटे आधार कार्ड दाखवून 'ट्रायडेंट' हॉटेलमध्ये राहत होते, ही माहिती 'एनआयए'च्या तपासातून समोर आली होती. 'एनआयए'ने आता 'ट्रायडेंट' हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले आहेत. 'ट्रायडेंट'च्या सीसीटीव्हीत सचिन वाझे यांच्यासोबत पाच बॅग्स दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असाव्यात, असा संशय व्यक्त केला जातो आहे. सचिन वाझे यांच्यासोबत नोटा मोजण्याचे मशीन तसेच एक महिला असल्याचे समजते. वाझे यांच्यासोबत असलेली महिला कोण? याचाही 'एनआयए' शोध घेणार आहे.