"जगातल्या सर्वात आनंदी देशात भारत १३९ वा"

    23-Mar-2021
Total Views |

happy india_1  


जागतिक आनंद निर्देशांक अहवाल जाहीर; फिनलँड सलग चौथ्यांदा प्रथम

नवी दिल्ली: २०२१ सालचा 'जागतिक आनंद निर्देशक अहवाल' जाहीर करण्यात आला. यामध्ये भारत देशाचा १३९ वा क्रमांक असून फिनलँडने सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे. शुक्रवार दि. १९ मार्च २०२१ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास संस्थेने जाहीर केलेल्या या अहवालात १४९ देशांचा समावेश करण्यात आला .


फिनलँड खालोखाल डेन्मार्क, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, आइसलँड, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन, लक्झेमबर्ग व ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे आणि आनंदी देशातल्या यादीत १४० वरून १३९ व्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.



एकूण देशांतर्गत उत्पन्न, सामाजिक पाठबळ, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार पातळी या निकषांवर आनंदी देशांची ही नावं निश्चित केली जातात. त्याचप्रमाणे या अहवालाचे लेखन करणाऱ्या लेखकांनी म्हटले आहे की, विश्वास हा कोणत्याही देशाच्या आनंद निर्देशंकात महत्वाचे मोजमाप असते. यंदा आशियाई देशांनी गेल्यावर्षीपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे चित्र आहे.