मुंबई : टी-२० मालिकेतील विजयानंतर भारतीय संघ इंग्लंड विरूध्दच्या एकदिवसीय सामन्यांसाठी तयार आहे. मालिकेतील तीन सामने दि. २३, २६, २८ मार्च रोजी पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन मैदानावर खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ घरच्या मैदानावर गेल्या २९ वर्षांपासून इंग्लंडकडून एकदाही मालिका पराभूत झालेला नाही. भारताबरोबर इंग्लंडने शेवटची मालिका १९८४मध्ये जिंकली होती. भारतीय संघाला आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंड विरूध्द पाठोपाठ सहावी मालिका जिंकण्याची संधी आहे.
भारतीय संघाने इंग्लंडला मार्च २००६मध्ये एकदिवसीय सामन्यात ५-१ अशा फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर इंग्लंडसंघाविरूध्द सलग ५ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ ४ वर्षानंतर भारतीय भुमीवर आमने सामने येणार आहेत. भारताने जानेवारी २०१७मध्ये घरच्या मैदानावरती एकदिवसीय सामन्यात २-१ असे पराभूत केले होते.
२०२१मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच खेळणार एकदिवसीय मालिका
२०२१मध्ये भारतीय संघाची ही पहिलीच एकदिवसीय मालिका असणार आहे. मागील दोन मालिकेत भारताला पराभव पत्कारावा लागला होता. फेब्रुवारी २०२०मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्टेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. घरच्या मैदानावर मागील दोन मालिका जिंकल्या आहेत. त्यामध्ये डिसेंबर २०१९मध्ये वेस्टइंडीज आणि जानेवारी २०२०मध्ये ऑस्टेलियाला पराभव पत्कारावा लागला होता.
भारत - इंग्लंड आमने - सामने
- दोन्ही संघामध्ये आत्तापर्यंत १८ एकदिवसीय मालिका खेळवल्या गेल्या आहेत. त्यामध्ये भारताने ९ तर इंग्लंडने ७ मालिका जिंकल्या आहेत. दोन मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत.
- भारतात दोन्ही संघांमध्ये ९ मालिका झाल्या आहेत. यामध्ये भारतीय संघाने ६ आणि इंग्लंडने १ मालिका जिंकली आहे. दोन मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत.
- भारत-इंग्लंड दरम्यान आत्तापर्यंत १०० टी- २० सामने खेळवले गेले, ज्यामध्ये भारताने ५३ आणि इंग्लंडच्या संघाने ४२ सामने जिंकले आहेत. ३ सामने अनिर्णीत राहीले आहेत.
- भारतीय संघाने घरच्या मैदानावर इंग्लंड बरोबर ४८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ३१ सामन्यात विजय मिळवता आला, तर १६ सामन्यात पराभव पत्कारावा लागला एक सामना अनिर्णीत राहिला.