शवविच्छेदन करणार्या डॉक्टरांचीही चौकशी
ठाणे : मनसुख हिरन हत्याप्रकरणी संशयाच्या भोवर्यात असलेले निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्या ठाण्यातील साकेत कॉम्लेक्समधील घरी बुधवार, दि. १७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ‘एनआयए’चे अधिकारी आले होते. सोसायटीत गाड्या धुणार्या १२ जणांकडे विचारपूस करण्यासह सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
दरम्यान, दहशतवादी विरोधी पथकाने मनसुख हिरन यांचा शवविच्छेदन अहवाल तयार करणार्या तीन डॉक्टर आणि मुंब्रा पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्यांची चौकशी केली.मनसुख हिरन यांच्या ‘डायटॉम रिपोर्ट’मध्ये मनसुख याच्या फुप्फुसात पाणी असल्याचा रिपोर्ट असल्याचे समजते. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख यांचे शवविच्छेदन केले. त्यात मनसुखच्या फुप्फुसात पाणी नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे दोन तपासण्यांत विसंगती असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे पुन्हा तपासणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बदलीसोबत चौकशीही करा.
पोलीस आयुक्तांची बदली केली. मात्र, या प्रकरणात त्यांचा काय संबंध आहे. याचीदेखील चौकशी व्हायला हवी. त्याचबरोबर ज्या नेत्यांचा हात यामध्ये आहे. त्यांच्यापर्यंत चौकशी व्हायला हवी. आम्ही यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करू आणि हिरनला न्याय देऊ.
- किरीट सोमय्या, माजी खासदार, भाजप