भेसळयुक्त खाद्यतेल बनवणाऱ्या कारखान्यांचा साठा जप्त

    18-Mar-2021
Total Views |

food adulteration_1 


अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा

मुंबई: गोपनीय माहितीच्या आधारे दि. १५ मार्च २०२१ रोजी सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांनी त्यांच्या पथकासह ओमकार ट्रेडिंग कंपनी व मे. शिवय ट्रेडिंग कंपनी, सातिवली, वसई (पु) या दोन खाद्यतेल रिपॅकींग करणाऱ्या आस्थापनांवर छापा टाकला. यामध्ये ३२ लाखापेक्षा जास्त किंमतीचे विविध खादतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 
  
या ठिकाणी खाद्यतेलांमध्ये भेसळ होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच खाद्यतेलाच्या रिपॅकींगसाठी जुन्या टीनचा पुनर्वापर होत असल्याचे दिसून आले. खाद्यतेलाच्या काही पाउचमध्ये पाकिटावर नमूद केलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचे खाद्यतेल भरले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या दोन्ही आस्थापनांमधून सुमारे ३२,५०,५६८/- रुपये किंमतीचा विविध खाद्यतेलांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक संशोधनासाठी घेण्यात आलेल्या खाद्यतेलांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आणि त्यांचे अहवाल प्राप्त होताच दोषींविरुद्ध कारवाई करण्यातदेखील करण्यात येणार आहे.
 
 
अन्न पदार्थ वा औषधे यांच्या गैरप्रकाराबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास ती टोल फ्री क्र.१८००२२२३६५ वर अन्न व औषध प्रशासनाला देण्याचे आवाहन सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांनी जनतेला केले आहे.