कल्याण : आधारवाडी क्षेपणभूमीला आग

    17-Mar-2021
Total Views |
damping ground aag_1 
 
 

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी क्षेपणभूमीला मंगळवारी रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगीमुळे धुराचे लोळ संपूर्ण परिसरात पसरले होते. डम्पिंग ग्राऊंडच्या ज्या भागात ही आग लागली तो भाग खाडीकिनारी असल्याने त्या ठिकाणी अग्निशमन गाड्या पोहचू शकल्या नाहीत.

तरीही अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आपल्या परीने थर्थीचे प्रयत्न केले. उष्णता असल्याने क्षेपणभूमीमध्ये मिथेन वायू होऊन आग लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाहून २०० मीटर अंतरावर सीएनजी गॅस पेट्रोल पंप आहे. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. आगीमुळे परिसरात धूर पसरला होता.

अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांसह चार टँकर घटनास्थळी पोहोचले होते. उन्हाळ्यात आधारवाडी क्षेपणभूमीला आग हा दरवर्षीचा प्रकार आहे. यंदाही हे सत्र सुरूच आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती कल्याण अग्निशमन दलाचे आधारवाडी स्थानक अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.