मुंबईत ३० ते ४० कुत्र्यांवर बलात्कार करणाऱ्या अहमद शाहीला अटक

    16-Mar-2021
Total Views |

ahamnd shahi rape dogs_1&



विकृत आरोपी म्हणतो, "प्राण्यांना आक्षेप नाही, तर हा गुन्हा कसा?"



मुंबई
: मुंबईतल्या तब्बल ३० ते ४० कुत्र्यांवर बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे आणि त्यावरून आता सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. मुक्या प्राण्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ६८ वर्षीय वृद्धाने अक्षरशः चक्रावून सोडणारे आणि धक्कादायक दावे केले आहेत. "जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही" असं उत्तर या विकृताने दिलं. सदर आरोपीने आतापर्यंत ३० ते ४० कुत्र्यांना आपल्या लिंगपिसाट विकृतीचे शिकार केल्याची भीती वर्तवली जात आहे.
 
  
अहमद हा मुंबईतील जुहू गल्ली भागातील रहिवासी आहे. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास तो हे भयंकर कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. अहमद भाजी विक्रेता असून, कुत्र्या-मांजरांना खायला देण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. व त्या मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक खुलासा याप्ररकरणी होत आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, प्राण्यांना खायला देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याची कबुली खुद्द अहमदने चौकशीदरम्यान दिली आहे. ‘बॉम्बे अॅनिमल राईट्स’ या एनजीओतील ४५ वर्षीय प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांच्या तक्रारीनंतर डीएन नगर पोलिसांनी अहमदला अटक केली. तक्रारदार विजय मोहनानी यांना अहमदच्या कृत्याविषयी फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने अहमद कुत्र्यांवर बलात्कार करत असल्याचा दावा केला. किळसवाणी बाब म्हणजे, त्याच्याकडे पुरावे मागितले असता, त्याने डिसेंबर २०२० मधील सदर कृत्याचा व्हिडीओ पाठवला. तो पाहून मोहनानी हादरले आणि त्यांनी डीएन नगर पोलिसांना दिला हा व्हिडीओ दाखवत तक्रार नोंदवली.
 
 
‘बॉम्बे अॅनिमल राईट्स’ एनजीओतील कार्यकर्ते जुहू परिसरातील कुत्र्यांची वैद्यकीय तपासणी करत आहेत. अत्याचार झालेल्या कुत्र्यांची यादी पोलिसांना सोपवली जाणार आहे. भूतदया नसलेल्या आरोपी अहमद शाहीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणीसुद्धा सर्व स्तरातून होताना दिसतेय.
 
 
मुंबईत याधीही घडली होती अशीच घटना
मालवणी परिसरातील एका रिक्षा चालकाने याबाबत अतिशय धक्कादायक माहिती दिली होती. चार जणांनी संबंधित कुत्र्यावर बलात्कार केल्याचे सांगितले होते. “आरोपींनी कुत्र्याचे पाय बांधले होते, कुत्रा ओरडत होता, त्यामुळे आपल्याला हा प्रकार समजला. आरोपींचा विकृतपणा रोखण्यासाठी आपण गेलो असता आरोपींनी धूम ठोकली” असेदेखील रिक्षाचालकाने यांना सांगितले होते. ड्रग्जच्या नशेत धुंद असलेल्या चार विकृतांनी कुत्र्यावर हा गँगरेप केला होता. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेल्या कुत्र्याला प्राणीप्रेमींनी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान कुत्र्याने अखेरचा श्वास घेतला.