मंदिर का पाडता विचारलं, मुलीच्या गुप्तांगात दगड टाकले, गळा चिरण्याचा प्रयत्न!

    14-Mar-2021
Total Views |

mm _1  H x W: 0
 
 

दोन तास मारहाण : अहमदपूरचा किळसवाणा प्रकार


अहमदपूर : एमपीएससीची तयारी करणाऱ्या किनगाव अहमदपूरच्या तरुणीला क्रुरपणे दोन तास मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी ठाकरे सरकारला जाब विचारला आहे. गावातील भवानी मातेचं मंदिर पाडायला आलेल्या लोकांना मंदिर का पाडताय म्हणून तिनं विचारले म्हणून तिला घरात घुसून मारहाण केल्याची माहिती वाघ यांनी दिली.
 
 
 
चित्रा वाघ यांनी पीडितेला मारहाण झाल्याच्या घटनेवरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, "एमपीएससीची तयारी करणरी किनगाव अहमदपूरची तरूणी गावातील भवानी मातेचं मंदिर पाडायला आलेल्या लोकांना मंदिर का पाडताय म्हणून तिनं विचारलं तर तिला घरात घूसून दोन तास या लांडग्यांनी मारहाण केली तिच्या सर्वांगावर चावे घेतले तिच्या गुप्तांगात दगड टाकले."
 
 
 
सरकारच्या भूमिकेमुळेच हरामखोर माजलेत!
"गळ्यावर कटर चालवायचा प्रयत्न केला. राज्यात झुंडशाही सुरू आहे का? घरात घुसून मुलींना मारण्याची हिंमत होतेच कशी?, अधिवेशनात महिला सुरक्षेवर सरकारचे भाषण ऐकून चार दिवस उलटले, बलात्काऱ्यांना अभय देणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेमुळेच हे हरामखोर माजले आहेत. ज्याची किंमत राज्यातील लेकीबाळींना मोजावी लागते आहे. कुछ तो शर्म करो!", असेही त्या म्हणाल्या.