कॅलिफोर्नियातील मैत्रिणीला पोहोचवत होता सोशल मीडियासाठी मजकूर
नवी दिल्ली : दिल्लीत २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर हिंसा भडकवणारा आरोपी दीप सिद्धूला पोलीसांनी मंगळवारी अटक केली. पंजाबी गायक दीप सिद्धू विरोधात लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवण्याचा आरोप आहे. दिल्ली पोलीसांनी त्याच्यावर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
दिल्ली पुलिसांच्या सुत्रांच्या मते, तो कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका सहकाऱ्याच्या संपर्कात होता. संबंधित व्यक्ती कलाकारही आहे. ती व्यक्ती सिद्धूकडून व्हीडिओ मिळाल्यानंतर त्याच्या सोशल मीडियावर अपलोड करत होती. त्याचा एक व्हीडिओ पोलीसांना आढळला होता, ज्यात त्याने शेतकऱ्यांना भडकावले होते. जमीन वाचवण्यासाठी नव्हे तर शेतकरी नेते राजकीय सूडातून आंदोलन करत आहेत.
कुरुक्षेत्र येथे महापंचायत विवाद
कुरुक्षेत्रतील मंडईत महापंचायतीपूर्वी एक दिवस नवा वाद निर्माण झाला आहे. तिथे शेतकरी नेते गुरनाम सिंह चढ़ूनी यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. कुरुक्षेत्र चढ़ूनी यांचाच जिल्हा आहे. चढ़ूनी म्हणाले, "मला महापंचायतीचे निमंत्रण न आल्याने आम्ही दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम नियोजित केले आहेत. त्यामुळे महापंचायतीत जाणार नाहीत.
मोदी शेतकरी आंदोलनावर बोलणार
सुत्रांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतिंच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर करणार आहेत. याच वेळी शेतकरी आंदोलनावर ते पुन्हा एकदा भाष्य करतील. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेतही शेतकरी आंदोलनाची चर्चा केली. शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यायला हवे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, "शेतकरी आंदोलनावर चर्चा तर खुप झाली. मात्र, मूळ मुद्द्यांना धरून सर्वजण बोलले असते तर चर्चा सार्थ झाली असे वाटले असते. जेव्हा हरित क्रांतीचा विचार केला जातो तेव्हा कठोर मुद्द्यांवर लाल बहादूर शास्त्रींनाही विचार करावा लागला असता. तेव्हा तर कुणीही कृषिमंत्री बनण्याचाही विचार केला नव्हता. अनेकांना भीती होती की कठोर निर्णयांमुळे राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल. आज जी गोष्ट माझ्याबद्दल बोलली जाते तेव्हा त्यांच्याबद्दलही याच गोष्टी बोलल्या जात होत्या. तेव्हा म्हटले जायचे की, अमेरिकेच्या इशाऱ्यावरून या गोष्टी होत आहेत.
मोदींच्या आवाहनानंतर शेतकरी पुन्हा चर्चेला तयार
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केल्यानंतर काही तासांनी संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य शिवकुमार कक्का म्हणाले होते की, ते पुढील चर्चेसाठी तयार आहोत. सरकारने आम्हाला भेटीची वेळ द्यावी. कक्का म्हणाले होते, "लोकशाहीत आंदोलनाची महत्वाची भूमिका आहे सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा विरोध करणे हा आमचा अधिकार आहे." मोदींच्या वक्तव्यानंतर राकेश टीकैत म्हणाले, "मोदींनी एमएसपी राहणार असे म्हटले आहे मात्र, त्यांनी हे स्पष्ट केले नाही की त्यावर कायदा तयार केला जाईल. देश भरवशावर नाही तर संविधान आणि कायद्यांवर चालतो."