"चोरीचा माल परत करावाच लागेल"

    09-Feb-2021
Total Views |

somyya_1  H x W


शिवसेना नेते आनंद अडसूळ चौकशीसाठी ईडी कार्यलयात

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सक्तवसुली संचालनालयात पोहोचले आहेत. येथे ईडीकडून त्यांची चौकशी होणार असून त्यामुळे ते ईडीच्या कार्यालयात हजार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आनंद अडसूळ यांनी घोटाळा केल्याचा आरोप रवी राणा व किरीट सोमय्या यांनी करत, ईडीकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर ते ईडीने आज बोलावल्यानुसार अडसूळ चौकशी हजर झाले आहे.यावर भाजप नेते व माजी खासदार यांनी चोरीचा माल तर परत करावाच लागेल असं म्हणत निशाणा साधला आहे.
 
 
अडसूळ यांचा विरोधात रवी राणा यांनी तक्रार करत म्हटल होत की, सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे ९१ हजार खातेदार असून यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची खाती या बँकेत आहेत. यापैकी शेकडो जण माझ्याकडे येऊन त्यांनी त्यांची मेहनतीची रक्कम ही बँकेत बुडाली असल्याची तक्रार केली होती. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर याचा धक्का बसलेल्या खातेदारांपैकी आतापर्यंत ४ खातेदारांचा यामुळे मृत्यू झालेला आहे.तसेच रवी राणा यांनी आरोप करत म्हटले होते की, की तत्कालीन बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बँकेत जमा झालेला पैसा मोठ्या कंपन्या, बिल्डर यांना कर्ज स्वरूपात दिले होते. एवढेच नाही तर बँकेच्या पैशाचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेण्यासाठी आनंदराव अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांनी केला असल्याचा आरोप रवी राणा यांनी ईडीकडे तक्रार करत केला होता .तसेच सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात अडसूळ यांचा संबंध असल्याचे म्हणत तक्रार केली होती.
 
 
अगोदर शिवसेना नेते संजय राऊत हे ईडीच्या रडारवर होते त्यात आता शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात असल्याचा आरोपा खाली त्यांची चौकशी आज होतेय. आनंदराव अडसूळ यांच्यावरील सर्व आरोपांची चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला केली होती. त्यानुसार आज ईडीने अडसूळ यांना कार्यालयात बोलावले आहे चौकशी होत आहे.
 
 
यावर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, आनंद अडसूळ यांच्या परिवाराच्या ट्रस्टच्या खात्यात एचडीएलमार्फत प्रवीण राऊत यांनी दीड कोटी रुपये पाठवले.का पैसे पाठवले राऊत आणि अडसूळ यांचा संबंध काय ? मोठी पैशाची अफरातफर झालीय.यासंदर्भात मी व रवी राणा यांनी ईडीकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार अडसूळ हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले आहेत व चौकशी सुरू आहे . चोरीचा माल तर परत करावाच लागेल.