'सरकारच डोकं किती फिरलेले आहे हेच स्पष्ट होतंय'

    08-Feb-2021
Total Views |

atul bhatkhalkar_1 &



मुंबई :
शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्वीट करणाऱ्या भारतातील सेलिब्रिटीच्या ट्वीटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.भारतरत्न सचिन तेंडुलकर, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेते अक्षय कुमार, अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांचा समावेश आहे. मात्र, हे ट्विट सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी भाजप सरकारच्या दबावापोटी केले असल्याचा संशय सचिन सावंत यांनी गृहमंत्री यांच्याकडे व्यक्त केला आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर भाजपने सडकून टीका केली आहे.



भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी देशहिताचा ट्विट केलंय या विरोधात कारवाई असं गृहमंत्री अनिल देशमुख यांच म्हणणं म्हणजे कोरोना अनिल देशमुख याना झालाय कि त्यांचा मेंदूला झालाय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे . मत्सर आणि द्वेषापोटी महाभकास आघाडी हे सरकार केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाचं भूषण असलेल्या व्यक्तींच्या विरोधात कारण नसताना कारवाई करणार. यावरून सरकारच डोकं किती फिरलेले आहे हेच स्पष्ट होतंय असं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.


तर कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर..आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणारे आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी ही ट्विट करत निशाणा साधला आहे.