३०५० लाही तुम्हीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2021   
Total Views |

vedh_1  H x W:


गुजरात भाजपने हे सिद्ध केले की, मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपमध्ये निदान गुजरातमध्ये तरी घराणेशाहीला थारा नाही. आता हे सगळे पाहून वाटते की, ‘धन्य, ते गुजरात भाजप आणि धन्य ते पंतप्रधान नरेंद्र मोदी.’


सोनल यांना गुजरात भाजपने नगरपालिकेचे तिकीट देण्यास नकार दिला. त्यांनी तिकीट मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता कुणी तिकीट मिळवण्याचे निकष लावून म्हणेल की, सोनल या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील. सोनल स्थानिक लोकांना परिचित नसतील किंवा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोनल यांच्या घरात कुणी नेता नसेल. पण तसे काही नाही. सोनल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सख्ख्या पुतणी आहेत. नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद यांच्या त्या कन्या. पण त्यांना गुजरात भाजपने तिकीट नाकारले आहे. नरेंद्र मोदींच्या नावाने आणि त्यांचे केवळ फोटो लावून भाजपचे तर सोडा, युतीतल्या सर्वच पक्षातील उमेदवार नगरसेवक झाले, अगदी आमदार झाले. त्या व्यक्तीचे नातेवाईक निवडणूक जिंकलेच असते. पण नाही गुजरात भाजपने हे सिद्ध केले की, मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपमध्ये निदान गुजरातमध्ये तरी घराणेशाहीला थारा नाही. आता हे सगळे पाहून वाटते की, ‘धन्य, ते गुजरात भाजप आणि धन्य ते पंतप्रधान नरेंद्र मोदी.’ कारण, राजकारणातच नव्हे, तर समाजकारणातही घराणेशाही अशी बोकाळली आहे की, विचारता सोय नाही. जणू नेत्याचा नातेवाईक हा ‘नेता’ म्हणूनच जन्माला येतो. आताशा सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचेही तेच झाले आहे. प्रभाग स्तरावर जर पाहिले तर हेच चित्र दिसते की, सर्वच पक्षांत एकाच घरातले चार-पाच जण पदाधिकारी आहेत. राजकारणाच्या नादाने आई-बाप मुला-मुलींना अक्षरश: राजकारणाच्या दावणीला बांधतात. कित्येक लोक पाहिले आहेत की, त्यांनी निवडणुका लढवल्या, पण ते हरले. मग आपल्या अपत्यांना राजकारणात ओढतात. भले, त्या अपत्यांना राजकारणाचा ओ का ठो कळत नसेल. काहींनी ‘महिला रिझर्वेशन वॉर्ड’ होईल म्हणून आपल्या घरातलील समस्त महिलांना राजकारणात पद दिले. काहींनी तर लग्न झालेल्या आणि सुरळीत संसार असलेल्या आपल्या लेकींना सासर सोडून माहेरी ठेवून घेतले. का? तर उद्या ‘महिला प्रभाग’ झाला तर मुलीकरिता तिकीट मागायचे? ‘महिला प्रभाग’ झाल्यावर आपल्या नऊ महिन्यांच्या गरोदर पत्नीला तिकीट मिळवून देणारे आणि तिच्या जीवाची जराही पर्वा न करता प्रचारात फिरवणारे लोकही पाहिले. त्यामुळे गुजरात भाजपने नरेंद्र मोदींच्या पुतणीला सोनाली मोदींना तिकीट दिले नाही ही ‘ब्रेक्रिंग न्यूज’ आहे.



अचानक तक्रारदार अन् लाभार्थीही


कृष्णा हेगडे हे नाव काही महिन्यांपूर्वी नवीन पिढीला माहितीही नव्हते. पण त्यांनी धनजंय मुंडेंना पाठिंबा दिला. त्यातही पीडित महिला आपल्यालाही जाळ्यात ओढू पाहत होती, अशी पोलिसांमध्ये जाऊन तक्रारही केली. सगळ्या जगाला माहिती आहे की, सत्य काय आहे? आता कृष्णा शिवसेनेत गेले म्हणजेच महाविकास आघाडीच्या गळाला लागले. त्यांचे पोलीस ठाण्यामध्ये जाणे, त्या महिलेविरोधात रान उठवणे हे सगळे कशासाठी होते? याचा अंदाज येऊ लागला आहे. राजकारण आहे. जिथे संपले तिथे पुन्हा कसलीच उमेद नव्हती. मात्र, धनंजय मुंडेंना सहकार्य केल्यावर त्यांना चांगले बक्षीस मिळाले आहे. कदाचित त्यांना पुढे-मागे उमेदवारीचे तिकीटही दिले जाईल. पण, हा पणच मोठा आहे. आताची जनता भावनेवर नाही तर सत्यावर विचार करते. त्यांना ती महिला जाळ्यात ओढत होती. त्यांना ‘मेसेज’ करत होती, पण ते भुलले नाहीत म्हणे. पण दुसरीकडे महिलेने तर त्याचवेळी खुलेआम वेगळेच सांगितले. त्यावेळी प्रश्न पडला होता की, इतक्या ज्येष्ठ व्यक्तीला एखादी महिला जाळ्यात ओढत होती, त्यावेळी ही व्यक्ती गप्प होती. लोकांच्या मते, या जाळ्यात ओढले जाण्याच्या प्रकरणाची मजा घेत होते. तोपर्यंत या व्यक्तीने कुणालाही सांगितले नाही की, ही अमुक अमुक महिला मला जाळ्यात ओढत आहेत. मात्र, धनंजय मुंडे प्रकरण सुरू झाले आणि त्यांना उत्साह आला. एकाएकी यांना जाणवले की, ती महिला आपल्यालाही जाळ्यात ओढत आहे. ज्यावेळी कृष्णा हे सगळे करत होते. त्यावेळी सामान्य माणसांना दोन प्रश्न पडले की, हे कोण कृष्णा हेगडे? दुसरा प्रश्न असा की, कृष्णा हेगडे आताच कसे बाहेर पडले? त्यानंतर या दोन्ही प्रश्नांबद्दल उत्तर शोधताना सामान्य नागरिकाने मनात गणित बांधले होतेच. ते गणित आज प्रत्यक्षात उतरले इतकेच. अर्थात, कृष्णा यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करावा किंवा कोणत्या पक्षाने त्यांना प्रवेश द्यावा, हा कृष्णांचा आणि त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तरीही सामान्य नागरिकांची अटकळ खरी ठरली, हे त्यातल्या त्यात महत्त्वाचे. कृष्णाच नव्हे तर कितीतरी लोक आपल्याला दिसतात की, ते अचानक तक्रारी दाखल करतात. त्या तक्रारीत तथ्य किती असते, हा संशोधनाचा विषय आहे. पण या असल्या अचानक तक्रारदार अचानक लाभार्थींचा विचार समाजाने एकदातरी करायला हवा.
@@AUTHORINFO_V1@@