काँग्रेससोबत शिवसेनेच्या बुद्धीचा "चक्काजाम" झालाय ?

    06-Feb-2021
Total Views |

 


mahavikas_1  H

सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर "ट्रॅक्टर" फिरवणार का? शेलारांचा सवाल
 

मुंबई : दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यात अनेक वादविवाद पहायला मिळत आहेत. यावरून परदेशी व्यक्तीनी याबाबत विधानं केली आहेत. यावरून परदेशी सेलिब्रिटी आणि भारतीय क्रिकेटपटू व कलाकारांमध्ये वादविवाद पाहायला मिळत आहे. परदेशी व्यक्तींच्या वक्तव्याचे काँग्रेस व शिवसेना समर्थन करत आहे.यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत, काँग्रेससोबत शिवसेनेच्या बुद्धीचा "चक्काजाम" झालाय ? असा प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे.
 
 
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने "पॉप डान्स" केला.तर या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात.
 
 
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला. त्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा "चक्काजाम" झालाय ? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर "ट्रॅक्टर" फिरवणार का? असे सवाल शेलार यांनी उपस्थित करत काँग्रेस व शिवसेनेवर निशाणा साधला आहे.