लोक म्हणतात, भारतरत्न प्रदान करा ! टाटा म्हणाले...

    06-Feb-2021
Total Views |

Ratan Tata _1  



नवी दिल्ली : मला भारतरत्न मिळावा यासाठी तुम्ही सर्वजण सोशल मीडियावर मोहिम सुरू करत आहात. याबद्दल मला आदर आहे, असे म्हणत टाटांनी एक विनंतीही केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताची शान असलेले दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर मोहिम खुली करण्यात आली आहे. या मोहिमेबद्दल टाटांना समजल्यावर त्यांनी याची दखल घेतली आहे.
 
 
 
  
ट्विट करत त्यांनी हे आवाहन भारतीयांना केले आहे. टाटा म्हणतात, "मला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी सुरू केलेल्या मोहिमेबद्दल मी तुमच्या भावनांचा आदर करतो. पण ही मोहिम तत्काळ थांबवा. मी स्वतःला भाग्यशाली मानतो. देशाचा विकास आणि समृद्धीत योगदान देऊ शकल्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो."
 
 
 
प्रेरणादायी वक्ते डॉ. विवेक बिंद्रा यांनी रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारे ट्विट केले होते. बिंद्रा ट्विटमध्ये म्हणतात, "उद्योगपती रतन टाटा यांना देशाने भारतरत्न द्यायला हवा. आमच्या या मोहिमेला जोडण्यासाठी जास्तीत जास्त रिट्विट करा. यानंतर ट्विटरवर 'रतन टाटा' आणि 'भारतरत्न फॉर रतन टाटा' हे दोन हॅशटॅग ट्रेंडींगला आले." टाटांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी पंतप्रधान कार्यालयाला ट्विट करत त्यांनी केलेल्या कार्याचा पाढा युझर्सनी वाचून दाखवला. परंतू टाटा यांनी विनम्रपणे ही मोहिम थांबवण्याची मागणी केली आहे.