शंभराव्या कसोटी सामन्यात जो रूटचे दमदार द्वीशतक
चेन्नई : भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याची दमदार सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. टीम इंडिया विरूध्द इंग्लंड यांच्यातील पहिल्या पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील 'एम ए चिदंबरम्' मैदानावर खेळवला जात आहे.
सामन्यातील दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने आठ गड्यांच्या बदल्यात ५५५ धावांचा डोंगर भारतासमोर रचला. कर्णधार जो रूटने २१८ अशी द्विशतकी दमदार खेळी केली. रूटने आपल्या काराकिर्दीतील शंभरव्या कसोटी सामान्यात पाचवे दुहेरी शतक ठोकले. तसेच षटकार ठोकून दोनशे धावांचा टप्पा गाठणारा तो इंग्लंडचा पहिला क्रिकेटपट्टू ठरला.
रूटने पोपच्या बरोबरीने पाचव्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी बेन स्टोक्स ११८ चेंडूत ८२ धावा करून बाद झाला. शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर त्याने चेतेश्वर पुजाराच्या हातात झेल दिला. मात्र, शनिवारचा दिवस रूटच्या नावावर राहिला तो भारतात गेल्या १० वर्षात द्विशतक लागवणारा पहिला विदेशी फलंदाज बनला आहे.
रूटला शाहबाज नदीमने पायचीत केले. तर पॉप ३४ धावांवर असताना रविचंद्रन आश्विनने पायचित केले. त्यानंतर इशांत शर्माने १७०व्या षटकाच्या दुसर्या चेंडूवर जोस बटलर आणि तिसर्या चेंडूवर जोफ्रा आर्चरला तंबूचा रस्ता दाखवला. इशांत शर्माने आत्तापर्यंतच्या कसोटी सामन्यातील २९९ बळी घेतले आहेत. दुसर्या दिवसअखेर इंग्लंडची ८ बाद ५५५ अशी मजबूत स्थिती आहे.