भारताकडून तमिळ चित्रपट 'सोहराई पोटरु' ऑस्करच्या शर्यतीत

    27-Feb-2021
Total Views |

Sorarai Potturu_1 &n
नवी दिल्ली : भारतीय चित्रपट सृष्टीसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आणखी एका भारतीय चित्रपटाची ऑस्करच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तो म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या अभिनित ‘सोहराई पोटरु’ हा सिनेमा ऑस्करच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सुधा कोंगारा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यासह विविध कॅटेगरीत सिनेमाने ऑस्करच्या यादीत प्रवेश केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवरुन ही बातमी दिली आहे.
 
 
 
९३व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्रता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इतर भारतीय भाषांच्या श्रेणीत ‘सोहराई पोटरु’ चित्रपटाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. सर्व देशांमधून निवडल्या गेलेल्या ३६६ चित्रपटांच्या यादीत ‘सोहराई पोटरु’ या चित्रपटाने स्थान मिळवले आहे. १५ मार्चला ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम नामांकनाची घोषणा होणार आहे. एअर डेक्कनचे सीईओ गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे. २०२०च्या उन्हाळ्यात हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र करोनाचे संकट आणि लॉकडाउन यामुळे अखेर निर्मात्यांनी अ‍ॅमेझॉन प्राइमवर सिनेमा प्रदर्शित केला. या चित्रपटातील अभिनेता सूर्याने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.