जागतिक स्वयंसेवी संस्था दिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2021   
Total Views |

NGO_1  H x W: 0
दि. २७ फेब्रुवारी आपल्या मायबोली मराठी भाषेचा दिन. आज महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात आणि वैभवशाली परंपरेत हा दिन साजरा होतो. पण, आजचा दिवस जागतिक स्तरावर ओळखला जातो तो जागतिक स्वयंसेवी संस्था दिन म्हणून. दि. १७ एप्रिल, २०१० साली या दिवसाची घोषणा करण्यात आली. मात्र, दि. २७ फेब्रुवारी, २०१४ साली या दिवसाला मान्यता मिळाली. या दिनाचे उद्दिष्ट काय तर जगभरातील स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरी आणि यशावर प्रकाश टाकणे, समाजातील स्वयंसेवी संस्थांची भूमिका लोकांना समजावणे, जगभरातील चांगल्या हेतूसाठी कार्य केलेल्या लोकांना प्रोत्साहित करणे. या दिनाचे लक्ष्य आहे आंतरराष्ट्रीय विकास, मदत आणि परोपकार ही भावना सर्वांमध्ये विकसित करण्याचे. जगभरात ८९ देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. आपल्या देशातही मोठमोठ्या स्वयंसेवी संस्था हा दिवस साजरा करतात.
 
 
असो. जगभरात कितीतरी देश असे आहेत की, जे केवळ आणि केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमुळे तगले आहेत. त्यात आफ्रिका खंडातील देश प्रामुख्याने म्हणता येतील. देशातील यादवी युद्ध, त्यामुळे रसातळाला गेलेली आर्थिक परिस्थिती, त्यातच दहशतवादाने माजवलेला हाहाकार यामुळे आफ्रिका खंडातील कितीतरी देशातील लोक उपासमारीने त्रस्त आहेत. या देशांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत, त्यामध्ये अन्न, आरोग्य, रोजगार आणि शिक्षण यावर काम करणाऱ्या संस्था खूप आहेत. तसेच मध्यपूर्वेतील मुस्लीम देशांमध्येही दहशतवादाने आतंक पसरवला आहे. या देशामध्ये अल्पसंख्याक लोकांचे आणि महिलांचे जगणे कठीण झाले आहे. या देशांमध्ये महिला सबलीकरण, मानव हक्क यावर काम करणाऱ्या कितीतरी स्वयंसेवी संस्था आहेत. अर्थात, सगळ्याच स्वयंसेवी संस्था केवळ आणि केवळ सेवाभावी वृत्तीने काम करतात असे आहे का? तर अजिबात नाही. ‘सीएसआर’ फंड किंवा ‘८०-जी सर्टिफिकीट’ काढून आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मदत मिळवणे, हा अनेक स्वयंसेवी संस्थांचा हेतू असतो. स्वयंसेवी संस्थांच्या जगाची हीच लाईफलाईन आहे.
 
 
स्वयंसेवी संस्थांचा विषय आहे म्हणून आठवले की, भारतामध्ये परदेशी आर्थिक मदतीवर चालणाऱ्या काही मोठ्या स्वयंसेवी संस्थांवर बंदी घातली गेली आहे. का? तर लक्षात येते की, या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून भरपूर फंड येत होता. त्यामुळे फंड देताना या परदेशांचे काही उद्दिष्ट होते. जसे भारतीय मूलभूत आणि भौतिक प्रगतीमध्ये अडथळा आणणे, भारतीय नागरिक भारतीय संस्कृती आणि मूल्ये यापासून दुरावली जावीत, युवा साहित्यिक आणि इतर कलाकार यांनी देश आणि समाजाविरुद्ध विखारी मतं अभिव्यक्त करावीत, भारत देशाला आर्थिक स्तरावर बरबाद करावे, लोकशाहीला धोका पोहोचवावा, विविध समाजामध्ये द्वेष किंवा तेढ माजवावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदूंनी धर्म त्यागून इतर धर्म स्वीकारावा, अशी परिस्थिती निर्माण करावी, अराजकता हिंसा आणि दंगल उसळून कायदा-सुव्यवस्था ढासळावी, अशा अनेक कृत्यांमध्ये काही स्वयंसेवी संस्था सामील असतात. दूरचे कशाला, पर्यावरणावर काम करणाऱ्या काही संस्थांनी आणि लोकांनी सरदार सरोवर बनू नये, यासाठी देशाचे किती नुकसान केले. दिल्लीतल्या ‘सीएए’ विरोधी आंदोलनात आणि फेक शेतकरी आंदोलनातही काही स्वयंसेवी संस्थाचे लागेबांधे तपासायला हवेत.
 
 
काही स्वयंसेवी संस्था अशाही आहेत की, त्या मुद्दाम मागासवर्गीयांच्या किंवा मुस्लिमांच्या वस्तीत थातूरमातूर सेवाकार्य करतात. जेव्हा केव्हा हिंदूविरोधी वातावरण तयार करायचे असते, तेव्हा या स्वयंसेवी लोकांना ‘देश आणि समाज किती नालायक आहे, तुम्ही या सगळ्याविरोधात उठा, रस्त्यावर या,’ असे लोकांना सांगतात. एक संस्था अशीच मुस्लीम वस्तीमध्ये काम करते.अध्यक्षाची ओळख नवबौद्ध. पण, प्रत्यक्षात तो धर्मांतरित ख्रिश्चन. केवळ सेवा करतो, असा त्याने ठसाच उमटवलेला. पण, मुंबईत दिल्लीच्या शेतकऱ्यांसाठी मोर्चा निघाला. तेव्हा मुंबईतील शीवच्या गुरुद्वारामध्ये जाऊन तिथल्या शीख धर्मगुरूंना शेतकरी मोर्चाला सहकार्य करा, लंगर लावा हे सांगण्यात हा अध्यक्ष पुढे होता. सांगायला नको की, या मोर्चात या वस्तीतील मुस्लीमही मोठ्या संख्येने सामील झालेले. तर अशा विध्वंसक आणि समाजद्रोही स्वयंसेवी संस्थांना सोडून इतर सर्व संस्थांना जागतिक स्वयंसेवी संस्था दिनाच्या शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@