राठोड समर्थकाकडून दुसरी अपेक्षा काय! : "म्हणे चित्राताईंना घरात घुसून मारू"

    25-Feb-2021
Total Views |

pooja chavan_1  
 



मुंबई : 'जसा राजा तशी प्रजा' या म्हणी प्रमाणे सध्या वनमंत्री संजय राठोड यांचे समर्थक विरोधकांवर तुटून पडले आहेत. एका मुलीच्या हत्येचा थेट आरोप लावण्यात आल्यानंतर नेत्याचे वर्तन कसे असावे, त्यांच्या समर्थकांनी काय भूमिका घ्यावी, याबद्दल तारतम्य उरलेले नाही. मात्र, बोलणाऱ्याला फोन करून धमक्या देणे, हाणामारी, चाकुसुऱ्यांनी भोसकून टाकण्याचा बाता राठोड समर्थक करताना दिसत आहेत. स्वतः भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला आहे.
 
 
 
 
 
निनावी धमक्यांचे फोन, राठोड यांच्याविरोधात आरोप केले म्हणून जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. संजय राठोड यांच्याच नावे एक फेक अकाऊंट चालवणाऱ्या युझरने तर हद्द पार केली आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटला कमेंट करत त्यांना थेट धमकी देण्याची हिंम्मत केली आहे. "समाजाचा एक घटक म्हणून आपणास इशारा देतो की मंत्रीपद राहो किंवा जावो परंतु संजय भाऊ वरील आरोप जर चुकीचे निघाले तर बंजारा समाजाच्या महिला चित्रा वाघ यांना घरात घुसून चपलेने बदाडल्याशिवाय राहणार नाही.", अशी थेट धमकी या अकाऊंटद्वारे त्यांना देण्यात आली आहे.
 
 
धमक्यांना भीक घालणारे आम्ही नाही!
 
चित्रा वाघ यांनी अशी विकृतींचा समाचार आपल्या पत्रकार परिषदेतून घेतला. अशा पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. महाराष्ट्रातील लेकीबाळींवर जिथे अन्याय होईल, तिथे आवाज उठवणारच असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे.