आता ४० लाख ट्रॅक्टरने संसदेला घेराव घालू - राकेश टिकैतांची चेतावणी

    24-Feb-2021
Total Views |
rakesh tikait _1 &nb



नवी दिल्ली -
'भारतीय किसान युनियन'चे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी आता दिल्लीतील संसद भवनाला ४० लाख ट्रॅक्टरने घेराव घालण्याची धमकी दिली आहे. दिल्लीच्या सीमेवरून शेतकरी परतण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी शेतकरी नेत्यांना मिळालेला पाठिंबादेखील संपला आहे. म्हणून धक्का बसलेल्या टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारला धमकी दिली आहे. राकेश टिकैत यांनी मंगळवारी सांगितले की, शेतकऱ्यांनी तयार रहावे. कारण, यावेळी ४ लाख ट्रॅक्टर नाही, तर ४० लाख ट्रॅक्टर घेऊन संसदेला घेराव घालायचा आहे.
 
 
टिकैत यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. राजस्थानच्या सीकरमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या किसान महापंचायतीला संबोधित करताना ते म्हणाले, "दिल्लीने आपले कान उघडे ठेवून ऐकावे. शेतकरी आणि ट्रॅक्टर तिथेच राहतील. यावेळी आम्ही संसदेवर धडक मारु आणि इंडिया गेटजवळील उद्यानात नांगरणी करुन पिकांची लागवड करु. ”
 
 
२६ जानेवारी रोजी झालेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत त्यांनी शेतकऱ्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचे म्हटले. संसद घेराव घालण्याची तारीख लवकरच निश्चित केली जाईल. त्यांनी मोठ्या कंपन्यांची गोदामे पाडण्याची धमकीही दिली आहे. योगेंद्र यादव यांनीही या मेळाव्यास संबोधित केले. टिकैत यांनी चूरू जिल्ह्यातील सरदार शहरात जाहीर सभा घेतली.