कल्याण : कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील दिलीप कपोते वाहनतळ स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात येणार असल्याने पार्किगची व्यवस्था बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनतळामध्ये पार्किग केली जाणारी वाहने कुठे पार्क करायची असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
कल्याणमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत स्टेशन परिसराचा विकास करण्यात येणार आहे. स्टेशन परिसरातच कपोते वाहनतळ आहे. या वाहनतळात अकराशे वाहने पार्किग केली जातात. हे वाहनतळ कालपासून बंद करण्यात आले आहे. वाहनतळ महापालिकेने कंत्रटी पध्दतीवर चालविण्यास दिला होता. आता या वाहनतळाची स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात येणार आहे.
त्यामुळे या वाहनतळांमध्ये कालपासून पार्किग व्यवस्था बंद करण्यात आली आहे. वाहनतळ खाली करून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कंत्रटदारांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. वाहनतळ बंद असल्याने दुचाकी कुठे पार्क करणार असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. स्टेशन परिसरात इतकी मोठी वाहनसंख्या असलेले दुसरे वाहनतळ उपलब्ध नाही. महापालिकेने कपोते वाहनतळ विकसित करण्यासाठी बंद करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करणो गरजेचे होते. मात्र महापालिकेने पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
महापालिका हद्दीत अन्य काही ठिकाणी ही पार्किगच्या जागा आरक्षित आहेत. त्या विकसित करण्याचे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कल्याण स्टेशनच्या पूर्व विभागात देखील पार्किगची व्यवस्था नाही. एका खाजगी व्यक्तींकडून वाहनतळ चालविला जात आहे. रेल्वेच्या जागेत अशाप्रकारे बेकायदा वाहनतळ चालविला जात असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात आहेत. स्टेशनच्या परिसरातील पार्किगच्या सुविधा नाही. जी सुविधा होती ती स्मार्ट सिटीमध्ये विकसित करण्यासाठी बंद केली आहे.
बेकायदा पार्किगच्या विरोधात पोलिस व महापालिका प्रशासनाची कारवाई शून्य
लॉकडाऊनच्या काळात रिक्षा बंद होत्या. त्यामुळे रिक्षा स्टॅण्डच्या वापर दुचाकी चालक पार्किगसाठी करीत होते. जून महिन्यापासून अनलॉक सुरू झाले. त्यानंतर रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या. कपोते वाहन तळासमोर ही रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली दुचाकी पार्क केल्या जात होत्या. आता वाहन तळबंद झाला असल्याने रस्त्यावर आणि रिक्षा स्टॅण्डच्या काही जागेत दुचाकी पार्क केलेल्या आहेत. या बेकायदा पार्किगच्या विरोधात वाहतूक पोलिसांची काही एक कारवाई नाही. त्याचबरोबर अन्य कोणी बेकायदा पार्कि ंगच्या नावाखाली पावत्या फाडून त्याचे स्वत:चे खिसे भरून महापालिकेचे नुकसान करीत वाहतूक कोंडीस जबाबदार असेल त्यांच्या ही विरोधात पोलिस व महापालिका प्रशासनाची कारवाई शून्य आहे.