मुंबई - 'महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड'कडून (महावितरण) कडून नालासोपारामध्ये गिरणी चालवणाऱ्या ८० वर्षीय गणपत नाईक यांना तब्बल ८० कोटी रुपयांचे वीजबिल मिळाले. त्यानंतर अचानक त्यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नालासोपाऱ्यातील निर्मल गावामध्ये सोमवारी (२२ फेब्रुवारी, २०२१) ही घटना घडली. ८० वर्षीय गणपत नाईक हे गावामध्ये छोटी गिरणी चालवतात. ते हद्यविकाराचे रुग्ण आहेत. अशावेळी त्यांनी महावितरणकरुन ८० कोटी रुपयांचे वीजबील मिळाले. हे वीजबिल पाहून त्यांचा रक्तदाब वाढला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. महावितरणने वीजबिलाची तपासणी केली असता मुद्रणामध्ये गडबड झाल्याचे लक्षात आले.
खरं तर, मीटर रीडिंगसाठी कंत्राट देण्यात आलेल्या एजन्सीने रीडिंगमध्ये चूक केली. एजन्सीने सहा अंकी वीजबिल तयार करायचे होते. परंतु, त्यांनी चुकून ते नऊ अंकी केले. अशा प्रकारे ८ लाख रुपयांचे वीजबिल ८० कोटी रुपयांचे झाले. एजन्सीने हे वीजबिल दुरुस्त करून नाईक यांना परत पाठविले. विद्युत अधिकारी सुरेंद्र मोनेरे म्हणाले की, गणपत नाईक पाठवलेल्या नवीन बिलावर समाधानी आहेत आणि ते योग्य बिल आहे.