योगासनांचा आता क्रीडा प्रकारात सामावेश, राष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धा

    23-Feb-2021
Total Views |

Yoga _1  H x W:
 
 



नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयातर्फे सहा महिन्यांत मान्यता प्राप्त नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशनचे काम गतीने सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये ४ मार्च ते १९ मार्च दरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन योगासन चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अटी कोणत्या आहेत तसेच पात्रतेचे निकष काय याची माहिती जाणून घेऊयात.
 
योगासन कुठल्या क्रीडा प्रकारात मोजले जाते ?
 
 
योगासन क्रीडा मंत्रालयातर्फे मान्यताप्राप्त आहे. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये या योगासनांचा सामावेश करण्यात आला आहे. योगासने शालेय आणि विद्यापीठांच्याही अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्यात आला आहे. प्राणायाम आणि ध्यान यांना मात्र या गोष्टी यातून वगळण्यात आल्या आहेत.
 
 
स्पर्धेमध्ये कोण सहभागी होऊ शकते ?
 
 
स्पर्धा सहा वयोगाटांमध्ये होईल. बाल्य गट १०-१५, कनिष्ठ १५-२०, वरिष्ठ २०-२८.


मुलींचा गट- बाल्य गट ९-१४, कनिष्ठ ४-१९, वरिष्ठ- ९-२७
 
 
 
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावे ?
 
पात्रता फेरी - एनवायएसएफशी संबंधित स्पर्धक सहभाग घेऊ शकतात. अभ्यासक्रमात निश्चित केलेल्या नटराज, चक्रासन, पश्चिमोत्थान, सर्वांगासन, भू-नमस्कार, एक पाद सिरासन, अर्ध मत्स्येंद्रासन) यांचा आसन करताना १०-१० सेकंदाचा व्हीडिओ युट्युबवर अपलोड करावा लागेल. याची लिंक पात्रता अर्जात भरून ऑनलाईन पद्धतीने सादर करावी लागणार आहे.
उपांर्त्यपूर्व फेरी : पात्रता फेरीतील सहभागी स्पर्धकांशिवाय राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील ७० पदक विजेत्यांना यात सहभगी होता येईल.
 
 
 
उपांत्य फेरी : सहभागींना चार अनिर्वाय आणि तीन पर्यायी आसन करावे लागणार आहेत या उपांत्य फेरीतून दहा सहभागींची अंतीम फेरीसाठी निवड करण्यात येईल
 
 
अंतीम फेरी- सहभागींना दोन अनिर्वाय आणि पाच पर्यायी आसन करावे लागणार आहेत. पाहिल्या तीन क्रमांकांना सुवर्ण, रजत, कांस्य पदक देण्यात येईल. दोन उत्तेजनार्थ पदके देण्यात येणार आहेत.
 
 
कोणत्या आसनाला किती गुण ?
 
 
आवश्यक आसनांना प्रत्येकी १० गुण, ऐच्छीक आसनांचे अ,ब,क,ड या गुणांमध्ये विभाजन केले जाणार आहे. त्यासाठी अनुक्रमे ११, १२, १३ असे गुण दिले जाणार आहेत.
 
 
स्पर्धेतील गुणांकन कसे असेल
 
 
पाच पंच, चार रेफरी असतील, स्कोरींग सॉफ्टवेअरद्वारे दिली जातील. पंचातर्फे दिलेला निर्णय अंतिम असेल.

(परिक्षित करंबेळे)