भित्र्या माकडाची गोष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2021   
Total Views |

vedh_1  H x W:

या बेकार माकडाची गोष्ट वाचून ‘मोदींचा ‘चार्ज’ काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा ‘चार्ज’ घेतला’ या नाना पटोलेंच्या विधानाची आठवण येत आहे. आता या विधानावर महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता म्हणत आहे की, पटोले ही सोनियामाईंचे आणि राहुलबाबांचे पाय ‘चाटोले’ झाले आहेत. त्यामुळे ‘पटोलें’चे ‘चाटोले’पण हे अत्यंत भिकार आहे.



जंगलात एक माकड असते. ते बेकार असते. त्याला माकडांच्या नेत्याला खूश करायचे असते. मग तो माकडांच्या कळपात वल्गना करतो की, मी जंगलाचा राजा सिंहाला नेस्तनाबूत करेन आणि माकडाच्या नेत्याला वनराज करेन. पण असे तो फक्त माकडांच्या कळपातच बोलत असतो. प्रत्यक्षात सिंहाला नेस्तनाबूत करायचे तर दूर; ते माकड सिंहाच्या नावानेच सूसू करत असते. पण सिंहाचे नाव घेतले की, इतर माकडे आपल्याला घाबरतात, हे या माकडाने पाहिलेले असते. मग तो सारखा-सारखा माकडाच्या कळपातच सिंहाला आव्हान देत असतो, सिंहापर्यंत हा निरोप पोहोचतच नाही. कारण, माकड कधीही सिंहासमोर जाणार नसते आणि जाणारही नसते. या बेकार माकडाची गोष्ट वाचून ‘मोदींचा ‘चार्ज’ काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा ‘चार्ज’ घेतला’ या नाना पटोलेंच्या विधानाची आठवण येत आहे. आता या विधानावर महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता म्हणत आहे की, पटोले ही सोनियामाईंचे आणि राहुलबाबांचे पाय ‘चाटोले’ झाले आहेत. त्यामुळे ‘पटोलें’चे ‘चाटोले’पण हे अत्यंत भिकार आहे. पटोल्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाची सुरुवात काय केली, तर मुंबईत औषधालाही नसणार्‍या शेतकर्‍यांचा मोर्चा काढला. त्या मोर्चात ‘डफली गँग’ हजर होतीच. या मोर्चात लाल झेंडेच जास्त होते. पण ग्रेटा थनबर्गचे ‘टूलकिट’ अख्ख्या महाराष्ट्राने त्याचवेळी पाहिले. निकीता जोसेफ, दिशा रवी, शंतनू मुळूक (शिवसेनेच्या नेत्याचा भाऊ) वगैरेंचे शेतकरी आंदोलनाच्या नावाने देशविघातक कृत्यही महाराष्ट्राने नव्हे, तर देशाने पाहिले. त्यामुळे पटोलेंच्या ‘चुकार’ आणि ‘टुकार’ मोर्चाने जनाधार गमावला. त्या मोर्चात मोठ्या फुशारकीत नेतृत्व करणारे पटोले सगळ्यांनी पाहिले. तिथेच महाराष्ट्राच्या जनतेने पटोलेंवर ‘फुल्ली’ मारली. पहिला तर पटोलेंनी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी सामना करावा, मग देशाच्या लाडक्या नेत्याशी सामना करण्याची फुशारकी मारावी. पटोलेंचे सध्याचे राजकीय पालक ‘गांधी घराणे’ आहे. पटोलेंचे पालक जिथे पंतप्रधानांसमोर उभे राहू शकत नाहीत, तिथे पटोले ‘किस झाडकी पत्ती!’ जाऊ दे पटोलेंनी ती भित्र्या लबाड असलेल्या माकडाने सिंहाला आपल्या कळपात असताना दिलेल्या आव्हानाची गोष्ट अवश्य वाचावी.



महाराष्ट्राचे फडणवीस


एकटे फडणवीस काय करणार? बरोबर आहे, सुप्रिया सुळेबाईंचे. फडणवीस एकटे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना तसे वाटणे साहजिकच आहे. कारण, फडणवीसांचे वडील, भाऊ, पुतण्या वगैरे कुणीही राजकारणात नाहीत. कुणीही खासदार-आमदार तर सोडाच, साधे नगरसेवकही नाहीत. इथे सुळेबाईंचे वडील, भाऊ, पुतणे सगळेच नेते. त्यामुळे सुळेबाईंना फडणवीस एकटे वाटत आहेत. त्यांच्या या विधानाला प्रसारमाध्यमांमध्ये भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काही लोक म्हणतात की, सिंह एकटाच असतो. त्याला गोतावळ्याची गरज नसते. काही म्हणतात, एकट्याने १०५ जिंकून दिले, पण दुसरीकडे ज्यांनी एकमेकांची तोंडेही आयुष्यात पाहिली नाहीत, असे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तेव्हा कुठे हे जनतेच्या भावना डावलून महाविकास आघाडी करत सत्ताधारी झाले. एकट्याने या तिन्ही राजकीय पक्षांना इच्छा नसतानाही एकत्र यायला लावले. किती तडजोडी करायला लावल्या. ते एकटे आहेत तरीही राज्यातल्या या तिन्ही पक्षांना सारखा जीवाला घोर लागून आहे की, काय माहिती आपली सत्ता उद्या राहील की नाही? या एकट्याला घाबरून महाराष्ट्राच्या स्थगिती सरकारने महाराष्ट्रात अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घातलीत. कुणीही या एकट्याच्या समर्थनार्थ बोलू नये, अशी भीतिदायक परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली. एकट्याने कोरेगाव-भीमा असो की खोट्या शेतकर्‍यांचा मोर्चा असो की कुणाही जातीपातीचा मोर्चा असो चांगलेच हाताळले आहेत. या एकट्याच्या राज्यात महाराष्ट्रात कधीही देशद्रोह्यांना समर्थन मिळाले नाही. जातपात आणि वैचारिक भिन्नता स्वीकार करून या एकट्याने महाराष्ट्र राज्याची प्रगती करण्याचा ध्यास घेतला. त्यामुळे सुळेबाईंनी त्यांना एकटे समजू नये. त्यांच्या पाठी महाराष्ट्रातली तमाम सज्जनशक्ती आहे. त्याच्या सोबत असंख्य लोक आहेत ते महाविकास आघाडी सरकारच्या अचाट कामगिरीने त्रस्त आहेत. फडणवीस यांचे निरपेक्ष सत्ताकारणाचे समर्थन करणारे राजकीय नेतेही आहेत. राजकारणात कुणीच कुणाचे नसते. सुळेबाईही एकट्याच असत्या, पण बापाची वेडी माया, वात्सल्य सोबत आहे. आता यावर रामदास स्वामी म्हणतात, ‘सांगे वडिलांची कीर्ती तोची एक मूर्ख.’ वडिलांची कीर्ती सांगण्यापेक्षा एकटे असणे कधीही बरेच...
@@AUTHORINFO_V1@@