साप्ताहिक राशिभविष्य : रविवार, दि. 21 फेब्रुवारी ते शनिवार, दि. 27 फेब्रुवारी 2021

    20-Feb-2021
Total Views |

HOROSCOPE _1  H




मेष : पुढचे पाऊल पडेल
 
 
राशीस्वामी मंगळ राहूच्या जोडीला धनस्थानी येत आहे. खर्चाचे प्रसंग पुढे येतील. कर्मस्थ बुध, गुरूमुळे कार्यक्षेत्रात पुढचे पाऊल टाकता येईल. प्रशासकीय सेवेत अनुकूलता वाढेल, स्वमताग्रह टाळावा, गृहनिर्माण कारखानदारी क्षेत्रात अनुकूलता वाढेल. डोळ्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी लागेल, उपजत कला-गुणांचा विकास होईल. महिलांना धनचिंता राहील. वाद टाळावेत, विद्यार्थ्यांना अनुकूलता वाढेल.
 
 
वृषभ : वादाचे प्रसंग टाळावेत
 
राशीतच मंगळ राहूच्या जोडीला येत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. कर्मस्थ रवि कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढवील. नव्या योजना विचारपूर्वक स्वीकाराव्यात. अनावश्यक खर्च टाळावेत. यांत्रिक, तांत्रिक क्षेत्रात प्रगती होईल. अडचणीतून मार्ग निघत जाईल. महिलांनी वादाचे प्रसंग टाळावेत. विद्यार्थ्यांना सुसंधी लाभतील. अपेक्षित घटना घडतील.
 
मिथुन : विलंबाने प्रगती
 
सप्ताहारंभी मंगळ बारावा येत आहे. आर्थिक व्यवहाराचे नियोजन करणे आवश्यक ठरेल. अष्टमातील शुभाशुभ ग्रहांमुळे विचाराने राहावे. कार्यक्षेत्रात विलंबाने पण प्रगती होईल. सरकारी कामे मनासारखी होतील. अपेक्षित संधीची प्रतीक्षा करावी लागेल. जुने येणे वसूल होईल. अडचणीतून मार्ग निघत जाईल. महिलांना धनचिंता राहील. विद्यार्थ्यांना कलेत प्रगती.
 
कर्क : समस्या सुटत जातील
 
 
सप्ताहातील बुध, गुरूमुळे सौख्याच्या घटना घडतील. विवाह विषयक निर्णय घ्यावा लागेल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. समस्या सुटत जातील. कार्यक्षेत्रात विचाराने राहावे. वरिष्ठांशी वादाचे प्रसंग टाळावेत. अपेक्षित संधी लाभतील. आर्थिक प्रगतीसाठी अधिक परिश्रमाची गरज आहे. महिलांना गृहसौख्य लाभेल. अडचणी सुटतील. विद्यार्थ्यांना नव्या संधी.
 
सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल
 
कार्यक्षेत्रात विचाराने राहावे. उद्या होणारे काम न झाल्याने नाराज राहू नका. वैद्यकीय, कृषी क्षेत्रात अडचणी येतील. नोकरीत कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. अपेक्षित कामासाठी पाठपुरावा करावा लागेल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. महिलांना स्वास्थ्य लाभेल. अपेक्षित घटना घडतील. विद्यार्थ्यांना प्रगतीचा काळ.
 
कन्या : अपेक्षित घटना
 
पंचमातील बुध, गुरूमुळे आर्थिक प्राप्तीच्या घटना घडतील. प्रशासन सेवेत अनुकूलता वाढेल. गृहनिर्माण, ज्ञानदान, वाहतूक क्षेत्रात अनुकूलता राहील. नव्या योजना साकार करता येतील. अडणीतून मार्ग निघत जाईल. अपेक्षित घटना घडतील. आशादायी वातावरण निर्माण होईल. महिलांना कलेत प्रगती होईल. गृहसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित घटना.
 
तुळ : प्रकृतीस जपावे
 
मंगळ आठवा येत आहे. त्यामुळे प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सुखस्थ बुध, गुरू गृहसौख्य देतील. नव्या कामासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. वास्तूच्या नूतनीकरणासाठी अनुकूल कालावधी आहे. अडचणी कमी होतील. कलेचा गौरव होईल. फार दगदग करू नका. महिलांना गृहसौख्य लाभेल. वाद टाळावेत. विद्यार्थ्यांना सुसंधी.
 
वृश्चिक : कला-गुणांचा विकास
 
राशीस्वामी मंगळ सप्तमात येत आहे. कौटुंबिक जीवनात सामंजस्याने राहावे. जीवन साथीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. कला-गुणांचा विकास होत जाईल. दगदग टाळावी. भागीदारीच्या व्यवसायात समस्या संभवतात. स्पर्धांमध्ये यश मिळेल. प्रगतीच्या घटना घडतील. महिलांना अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या संधी लाभतील.
 

धनु : प्रकृती सांभाळा
 
 
धनस्थ बुध, गुरूमुळे आर्थिक बाबतीत समाधानकारक घटना घडतील. यांत्रिक क्षेत्रात अनुकूलता वाढेल. अंगीकृत कार्यात अनुकूलता वाढेल. घाईने निर्णय घेऊ नका. सरकारी कामे मनासारखी होतील. षष्ठातील मंगळ, राहूमुळे शारीरिक तक्रारी राहतील. दुर्लक्ष करू नका. अडचणीतून मार्ग निघत जाईल. महिलांना अनुकूलता राहील. प्रकृतीस जपावे. विद्यार्थ्यांना अनुकूलता वाढेल.
 
मकर : नव्या कामाला गती
 
राशीतील बुध, गुरूमुळे आत्मविश्वासाने कार्यसिद्धी होईल. आर्थिक प्रगतीसाठी अनुकूलता वाढेल. नव्या कामांना गती मिळेल. अडचणीतून मार्ग निघत जाईल. संततीच्या प्रगतीसाठी अधिक लक्ष घालावे लागेल. घरातील वास्तव बिघडू देऊ नका. हाती घेतलेली कामे चिकाटीने यशस्वी होतील. महिलांना गृहसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना अडचणी संभवतात.
 

कुंभ : कार्यसिद्धी होईल
 
 
सुखस्थ राहूवर मंगळ येत आहे. अस्वास्थ्य राहील. आर्थिक कामासाठी अधिक पाठपुरावा करावा लागेल. कला-गुणांना चांगल्या संधी लाभतील. ठाम विचाराने राहावे. कार्यसिद्धी होत जाईल. अपेक्षित घटना घडतील. अडचणीवर मात कराल, घाईने निर्णय घेऊ नका. अनुकूलता वाढेल. महिलांनी वादाचे प्रसंग टाळावेत. वास्तुदोष संभवतो. विद्यार्थ्यांना सुसंधी.
 
 
मीन : नव्या विचारांना चालना
 
 
लाभातील बुध, गुरूमुळे आर्थिक विकासाच्या संधी लाभतील. अंगीकृत कार्यात यशासाठी अधिक पाठपुरावा करावा लागेल. नव्या विचारांना चालना मिळेल. अनावश्यक खर्च टाळावेत. अडचणीतून मार्ग निघत जाईल. नव्या ओळखी लाभप्रद ठरतील. कलेचा विकास होईल. महिलांना गृहसौख्य लाभेल. अनुकूलता वाढेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित घटना.



-  नारायण कारंजकर (9423758401)