हिंदूंचा अवमानप्रकरणी शरजीलवर अखेर चार दिवसांनी गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2021   
Total Views |




SHAR_1  H x W:


राज्यभरातून तक्रारी आणि पाठपुराव्यानंतर सरकारला आली जाग; 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यास सरकार निरुत्साही ?

आयोजकांवर गुन्हा नाहीच


पुणे (सोमेश कोलगे) : पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदूंचा अवमान करणार्यास शरजील उस्मानीविरोधात अखेर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतो आहे. तक्रारदार प्रदीप गावडे यांच्या जबाबानंतर ही कारवाई केली जात असल्याचे समजते. परंतु तक्रारीत म्हटल्याप्रमाणे देशद्रोह इत्यादी आरोप शरजीलवर ठेवण्यात आलेले नाहीत.  भारतीय दंडविधान कलम 153A (दंगल भडकवणे) खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल करावा याकरिता राज्यभरात तक्रारी दाखल झाल्या होत्या.

दिनांक 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल चार दिवसांनी गुन्हा दाखल केला जातो आहे.

पुण्यात प्रदीप गावडे यांनी 1 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. त्यांतर कारवाई झाली नाही म्हणून 2 फेब्रुवारी रोजी राज्यभरात ठिकठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या. खेरवाडी पोलिस ठाण्यात मोहन साळेकर, शिवडीत ब्रह्मदेव आतकरी, कल्याणमध्ये समृद्ध ताडमारे, विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने अंजली एमआयडीसी, विक्रोळीत योगिता साळवी, नाशिकमध्ये अजिंक्य साने, ठाण्यात भटु सावंत, नवी मुंबई, कर्जतमध्ये हृषीकेश जोशी यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.
एल्गार परिषदेला प्रक्षोभक भाषणाची पार्श्वभूमी आहे. 2017 साली झालेल्या एल्गार परिषदेनंतर महाराष्ट्रभर हिंसाचार उसळला होता. त्यांनातर दोन वर्षे या परिषदेला परवानगी नाकारण्यात आली. 

शरजीलच्या भाषणात ‘आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है.....’ असे शब्द होते. शरजीलच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला.


@@AUTHORINFO_V1@@